esakal | रात्री नऊपर्यंत दुकानांना हवीय परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

Fule market

नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, भाऊबीज या सणातील व्यावसायिक संधीचा विचार करून व्यवसायांची वेळ किमान रात्री नऊपर्यंत करावी, अशी मागणी भारतीय केट असोसिएशन राज्य शाखेकडून करण्यात आली आहे.

रात्री नऊपर्यंत दुकानांना हवीय परवानगी

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : लॉकडाउनमुळे प्रदिर्घ काल बंद राहिलेला व्यापार व्यवसाय आता सुरु झाला आहे. परंतु शहरात दुकान, व्यापार, व्यावसायिक आस्थापना सायंकाळी सातपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. आगामी नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी, भाऊबीज या सणातील व्यावसायिक संधीचा विचार करून व्यवसायांची वेळ किमान रात्री नऊपर्यंत करावी, अशी मागणी भारतीय केट असोसिएशन राज्य शाखेकडून करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाउन केले. त्यानंतर टप्याटप्याने लॉकडाउन शिथिल करण्यात आले. मात्र अद्याप व्यापार, व्यवसाय, आस्थापना सायंकाळी सातपर्यंत सुरु ठेवण्याऐवजी रात्री ९ पर्यंत सुरू ठेवावेत. यामुळे विशिष्ठ वेळी होणारी गर्दी टळेल. अशी मागणी राज्‍य केट शाखेच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापालिकाआयुक्त सतीष कुलकर्णी यांच्या करण्यात आली आहे. 

आज पाचवे अनलॉक सुरू झाले आहे. त्यानंतर ही मागील आठवड्यापासून शहरात बाधित रूग्णांची संख्या कमी कमी होत आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करुन योग्य निर्णय घ्यावे; अशी विनंती राज्य केट असोसिएशनतर्फे वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हा अध्यक्ष संजय शाह, राम सूर्यवंशी, सुभाष कासट, शंकर ललवाणी, विजय रेवताणी यांनी केली आहे.

संपादन ः राजेश सोनवणे

loading image