esakal | पंकजाताई भाजप सोडा..शिवसेनेत प्रवेश करा!
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

पंकजाताई भाजप सोडा..शिवसेनेत प्रवेश घ्या!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : पंकजाताई भारतीय जनता (BJP) पक्ष सोडा, शिवसेनेत प्रवेश करा, अशा स्वरूपाची मोहीम वंजारी सेवा संघातर्फे सोशल मीडियावर चालविली आहे तर आज शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी देखील पंकजा मुंडे (Pankaja Munde) या शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागत असल्याचे मत आज व्यक्त केले.

(jalgaon vanjari community pankaja munde shiv sena survey by party entry)

हेही वाचा: आमदारांत रस्सीखेच;ब्रेक टेस्ट ट्रॅक सेंटर भडगाव की चाळीसगावात?


भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर भाजप अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाजबांधवांची आहे. त्यामुळे या पक्षाचा त्यांनी तातडीने त्याग करून शिवसेनेत प्रवेश करावा, असे आवाहन समाजबांधव करीत आहेत. महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले, की भाजप वाढविण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी कष्ट केले. मात्र आज त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्यावर पक्ष अन्याय करीत आहे. त्यांना पक्षाने सन्मानाने विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त करण्याची गरज होती. मात्र त्यांचा तो सन्मान करण्यात आला नाही. त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या यादीत नाव होते, ऐनवेळी त्यांचे नाव रद्द करण्यात आले. पक्षातर्फे त्यांच्यावर हेतुपुरस्सर अन्याय करण्यात येत आहे.

खडसेंवर देखील अन्याय..

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही पक्षाने अशीच वागणूक दिली, त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले. आता त्याच पद्धतीने पंकजाताई यांना भाजप वागणूक देत असल्याचे चित्र आहे. वंजारी समाज भाजपचा निषेध करीत आहे. पंकजाताई यांनी आता भाजपमध्ये न राहता शिवसेनेत प्रवेश करावा, त्या ठिकाणी त्यांचा योग्य सन्मान होईल, अशी मागणीही आम्ही करीत आहोत. यासाठी समाजाच्या युवकांतर्फे सोशल मीडियावर मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘अनलॉक’ नाहीच!

शिवसेनेत पकंजाताईचे स्वागत..

स्व. गोपीनाथ मुंडे यांचे व त्यांच्या कुटूंबाचे कार्य मोठे असून त्यांच्या वारसाला न्याय मिळावा यासाठी समाजाला वाटत आहे. शिवसेनेत जर पंकजा मुंडे आल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यांना शिवसेना नक्की महत्वाचे स्थान देवून त्यांचा सन्मान करेल असे मंत्री गुलाबराव पाटील आज त्यांच्या मतदार संघातील फुफनगरी गावात म्हणाले.

loading image
go to top