जळगाव जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा ब्रेक !

जळगाव जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा ब्रेक !
Updated on: 

जळगाव  ः जिल्ह्यात आतापर्यंत १२२ टक्के पाऊस झाला आहे. एवढेच नव्हे तर गिरणा, हतनूर, वाघूर धरणही शंभर टक्के भरल्याने त्यातून मोठा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रात पाणी सोडल्याने गिरणा, तापी, वाघूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे एक हजार हेक्टरपेक्षा जास्त खरिपाचे क्षेत्र प्रभावित झाले आहे. हवामान विभागाने येत्या शनिवारपासून (ता. २६) पावसाचा ब्रेक असेल, असा अंदाज वर्तविला आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या अधिक पाऊस झाल्याने पिकांना फटका बसत आहे. अगोदर उडीद, मुगाचे मोठे नुकसान झाले. आता सुरू असलेल्या पावसाने ज्वारी, कापूस, तीळ, केळीला फटका बसत आहे. हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसाने वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पावसामुळे सर्वच ग्रामीण शहरी भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. यामुळे पाऊस कधी जातो, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. 
आगामी काळात पावसाची काय स्थिती असेल, याबाबत हवामानतज्ञ नीलेश गोरे यांच्याकडून जाणून घेतले असता ते म्हणाले, की २६ सप्टेंबरपासून पाऊस ब्रेक घेईल. २४ पासून तापमानात वाढ होईल. ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर ‘हीट’चा अनुभव नागरिकांना घेता येईल. या महिन्यात तापमान चाळीस अंशापर्यंत जाऊ शकते. सध्या पडणारा पाऊस परतीचा असल्याने काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात होत आहे. मात्र, या आठवड्यात पाऊस ब्रेक घेईल. 

हवामान तज्ञांच्या मते 
* जिल्ह्यात २६ सप्टेंबरपासून पावसचाा ब्रेक 
* २५ सप्टेंबरला काही ठिकाणी हलक्या, मध्यम पाऊस 
* २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानात चढ-उतार होणार 
* ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानात वाढ 
* ऑक्टोबर ‘हीट’चा फील येण्याची शक्यता 
* ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com