झेडपीने थकविले साकेगावातील पथदिव्यांचे बिल; दहा दिवसांपासून गाव अंधारात

झेडपीने थकविले साकेगावातील पथदिव्यांचे बिल; दहा दिवसांपासून गाव अंधारात
street light
street lightsakal

भुसावळ (जळगाव) : साकेगाव (ता. भुसावळ) येथे गेल्या दहा दिवसांपासून थकित वीज बिलापोटी पथदिवे बंद असून, विरोधक याचे राजकारण करीत आहे. मात्र, आजपर्यंत पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषद प्रशासन (Jalgaon zilha parishad) भरीत होते. ऊर्जा विभागाच्या शासन निर्णय १६ मे २०१८ नुसार ग्रामपंचायत हद्दीतील ३१ मार्च २०१८ पर्यंत पथदिव्यांचे बिल महाराष्ट्र शासनाने भरणे अनिवार्य असल्याचे निर्णयात नमूद असल्याने सरकारने त्वरित बिल भरावे व गावातील बंद पथदिवे त्वरित सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत कमिटीने (MLA Sanjay savkare) आमदार संजय सावकारे यांना निवेदन दिले आहे. (jalgaon-zilha-parishad-pending-stree-light-bill-and-mahavitaran-connection-cut)

street light
पुरस्कारातून ऊर्जा घेऊन आता सर्वोत्कृष्ट कामे : जिल्हाधिकारी राऊत

निवेदनात नमूद करण्यात आले कि, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचे वीजबिल (Street light bill pending zilha parishad) जिल्हा परिषद प्रशासन वित्त आयोग आठवा विविध अनुदानातून कपात करून, भरण्यात येत होते. मात्र महाराष्ट्र शासनाच्या उद्योग उर्जा व कामगार विभागाचा शासन निर्णय १६ मे २०१८ नुसार मुद्दा क्रमांक चारमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत हद्दीतील ३१ मार्च २०८ पूर्वी जे पथदिवे ग्रामपंचायत भागात आहेत. त्या पथदिव्यांची पुढील वीज देयकाची रक्कम ग्रामविकास विभागाने महावितरण कंपनीकडे शासन अनुदान किंवा वित्त आयोगाच्या अनुदानातून भरणा करावी, तसेच ३१ मार्च २०१८ नंतरच्या स्थापित झालेल्या पथदिव्यांच्या वीज देयकांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतकडून महावितरण कंपनीस अदा करावी, नवीन पथदिव्यांसाठी वेगळे मीटर बसविण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश शासन निर्णयात दिलेले आहे.

विरोधकांच्या तक्रारीमुळे वीजपुरवठा खंडित

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आजपर्यंत गावातील पथदिव्यांचे बिल न भरल्याने तसेच गावातील विरोधी सदस्याने तक्रार दाखल केली त्यामुळे गावातील पथदिवे गेल्या दहा दिवसांपासून बंद आहेत. यासंदर्भात साकेगाव ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित जीआरचा अभ्यास करून गटविकास अधिकारी तथा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून आमदार संजय सावकारे यांना निवेदन दिल. याद्वारे महाराष्ट्र शासनाने त्वरित महावितरणकडे थकित बिल भरून गावातील पथदिव्यांचा बंद वीज पुरवठा त्वरित सुरू करावा, अशी मागणी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सरपंच पती विष्णू सोनवणे, माजी सरपंच सुरेश पाटील, समाज सेवक सुभाष कोळी, ग्रामपंचायत सदस्य कुंदन कोळी, पप्पू राजपूत सागर सोनवाल, गजानन पवार, सुभाष सोनवणे, गजानन कोळी आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com