जामनेर पंचायत समितीत अधिकारी-पदाधिकाऱ्यांत संघर्ष; पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

सुरेश महाजन
Saturday, 21 November 2020

बिडिओनी एका कर्मचाऱ्यांच्या हातून काही ग्रामपंचायतचे तब्बल तीस लाखाचे धनादेश ठेकेदाराकडे दिले. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक राजीनामे देणे यावर चर्चा केली.

जामनेर : पंचायत समितीत काही विशिष्ट कामांचे धनादेश न देण्यावरून अधिकारी-पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसु लागली आहे . पदाधिकाऱ्यांनी केलेल्या लेखी सूचनेला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचा पवित्रा घेतल्याचे समजते.

आवश्य वाचा- ‘नो मास्क नो विक्री’ नाही तर पुन्हा लॉकडाऊन होणार; जिल्हाधिकारींचा इशारा ! -
 

पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यांकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असुन. काही दिवसापूर्वी उपसभापती एकनाथ लोखंडे यांच्यासह काही सदस्यांची पंचायत समिती दालनात बैठक झाली. या बैठकीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या सार्वजनिक विहिरी, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेली शौचालयांची कामे व शाळेच्या संरक्षक भिंती अशा काही ठेकेदारांनी केलेल्या कामाचे धनादेश देऊ नये, अशा सूचना सभापती ,उपसभापती व सदस्यांनी गटविकास अधिकारी जे. व्ही. कवळदेवी यांना केल्या. असे लेखी पत्र सभापती सुनंदा पाटील यांनी दिले.

बिडीओंचा मनमानी कारभार 

मात्र त्यानंतर देखील बिडिओनी एका कर्मचाऱ्यांच्या हातून काही ग्रामपंचायतचे तब्बल तीस लाखाचे धनादेश ठेकेदाराकडे दिले. यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक राजीनामे देणे यावर चर्चा केली. याबाबत बीडिओ कवळदेवी यांना विचारणा केली असता. कोणत्याही ठेकेदाराचे बिल काढले नाही .ज्या ग्रामपंचायतचे प्रस्ताव आले होते. केवळ त्यांनाच धनादेश दिल्याचे सांगितले.

 

वाचा- आमदारांच्या आश्वासनानंतर शेतकरी संघटनेने उपोषण घेतले मागे 
 

तर सर्व पदाधिकारी राजीनामा देवू

विशिष्ठ हेतुने पात्र लाभार्थ्यांना डावलून कर्मचारी-अधिकारी ठेकेदारांचे बिले काढतात. अशाच प्रकारे सौचालये, रोजगार हमी योजनेच्या सार्वजनिक विहिरी, शेततळे या या कामाचे तब्बल 50 लाखापर्यंतचे धनाजी दिले जाणार होते .ठेकेदारांचे धनादेश काढू नये, अशा तोंडी व लेखी सूचना आम्ही दिल्या आहेत.तरीही बीडिओ कवळदेवी यांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून धनादेश दिले. पंचायत समितीत पदाधिकाऱ्यांना किंमत नाही .त्यामुळे सर्वांनी सामूहिक राजीनाम्याची तयारी केली आहे. सुनंदा पाटील सभापती पंचायत समिती जामनेर.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jamner conflict between officers and office bearers in jamner panchayat samiti