esakal | जामनेरला राडा; कापुस खरेदी केंद्रावर टोकन देताना वशिलेबाजी  
sakal

बोलून बातमी शोधा

जामनेरला राडा; कापुस खरेदी केंद्रावर टोकन देताना वशिलेबाजी  

आघाडीचे सरकार असताना फेडरेशन सुरू नसल्याने सीसीआय खरेदी केंद्रावर अतिरिक्त भार पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.

जामनेरला राडा; कापुस खरेदी केंद्रावर टोकन देताना वशिलेबाजी  

sakal_logo
By
सुरेश महाजन

जामनेर : देशभरातील शेतकरी वर्ग आधीच विविध समस्यांनी ग्रस्त असताना येथील बाजार समितीकडून कापूस उत्पादक असलेल्या खऱ्या शेतकऱ्यांना टोकन न देता चक्क व्यापाऱ्यांच्या वाहनांना तत्काळ टोकन वशिलेबाजीने वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करून असंख्य शेतकऱ्यांनी बाजार समिती आवाराबाहेरच रस्त्यावर सायंकाळच्या वेळेला ठिय्या मांडून चांगलाच गोंधळ घातला.

आवश्य वाचा- बीएचआर’ घोटाळ्यातील ‘म्होरक्या’ला पोलिस कधी पकडणार ?
 

सध्या कपाशीची काढणी अंतिम टप्प्यात असली तरी अनेक शेतकऱ्यांनी कपाशी आता बाहेर विक्रीला काढली आणि सीसीआयच्या खरेदी केंद्रांवर मोजून देण्यासाठी क्रमवारी पद्धतीने बाजार समिती आवारातील जागेत तीन-चार दिवस आधीपासून तेथे वाहने लावून ठेवतात. मात्र दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या वाहनांनाच आधी कसे टोकन मिळते, आम्हाला टोकन वेळेवर का मिळत नाही, अशा प्रश्नांचा भडिमार या वेळी शेतकऱ्यांकडून प्रशासनालाकरण्यात येत होता.

पोलिस आले बाजार समितीत

शेतकऱ्यांचा गोंधळ पाहून बाजार समितीने पोलिसांना पाचारण केले. पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोचल्यानंतर काही प्रमाणात शांतता होऊन नंबरप्रमाणे टोकन देणे पुन्हा सुरू करण्यात आले. भाजपचे तालुकाध्यक्ष तथा शेतकी संघाचे सभापती चंद्रकांत बाविस्कर, नवलसिंग पाटील, प्रशासक डी. व्ही. पाटील, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील आदीही घटनास्थळी पोचल्यानंतर तणाव काहीसा कमी होऊन टोकन देण्याची प्रक्रियाही सुरू झाल्याने उपस्थित असंख्य शेतकऱ्यांना आजतरी काहीसा दिलासा मिळाला. आता यापुढेही इमानेइतबारे वशिलेबाजी टाळून नंबरवारी टोकन देण्यात यावे, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

वाचा- मुलीला फुस लावून सैराट सारखे पळाले; मात्र पोलिसांनी शिताफीने पकडले, मुलीची सुखरुप सुटका -

महाविकास आघाडी सरकारने आकसापोटी बाजार समितीवर प्रशासक बसविले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचा वचक राहिला नाही. कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. तसेच आघाडीचे सरकार असताना फेडरेशन सुरू नसल्याने सीसीआय खरेदी केंद्रावर अतिरिक्त भार पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. तीन ते चार दिवस रांगेमध्ये थांबावे लागत आहे. हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आहे, यापुढे प्रशासकांनी योग्य कार्यपद्धती न अवलंबल्यास शेतकऱ्यांसाठी भाजप रस्त्यावर उतरले. 
- चंद्रकांत बाविस्कर 
भाजप तालुकाध्यक्ष तथा सभापती, शेतकी संघ, जामनेर 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top