esakal | मुलीला फुस लावून सैराट सारखे पळाले; मात्र पोलिसांनी शिताफीने पकडले, मुलीची सुखरुप सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीला फुस लावून सैराट सारखे पळाले; मात्र पोलिसांनी शिताफीने पकडले, मुलीची सुखरुप सुटका

साधारण दोन महिन्यांपुर्वीच प्रकाशने स्मिताशी ओळखी केली होती. बारावर्षीय मुलीला भेटवस्तू व लग्नाचे आमिष दाखवत दुचाकीने पळवून नेले.

मुलीला फुस लावून सैराट सारखे पळाले; मात्र पोलिसांनी शिताफीने पकडले, मुलीची सुखरुप सुटका

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव : केाल्हाडी(ता.बोदवड) येथील शेतातून बारा वर्षीय बालीकेला फुस लावून पळवून नेणाऱ्या दोघा तरुणांना गुन्हेशाखेने इंदैार येथून ताब्यत घेत पिडीतेची सुटका केली. चित्रपटातील कथानका प्रमाणे मुलीला दुचाकीवर घेवून दोघे मित्र मंगळवार(ता८) दुपार पासुन घेवून पसार झाले होते. 

आवश्य वाचा- चक्क ‘कलेक्टर’च उतरले महामार्गाच्या पाहणीसाठी ! -
 

कोल्हाडी (ता.बोदवड) शिवारात सालदार म्हणुन कार्यरत दाम्पत्याची १२ वर्षीय मुलगी स्मिता आई-वडीलांसोबत शेतात काम करायची. शेजारीच एका शेतात प्रकाश रतन बाविस्कर(वय-२२) हा त्याचा मित्र गणेश सुनील राणे(वय-१९) कडे येत होता. साधारण दोन महिन्यांपुर्वीच प्रकाशने स्मिताशी ओळखी केली होती. बारावर्षीय मुलीला भेटवस्तू व लग्नाचे आमिष दाखवत मंगळवारी (ता.८) रेाजी दुपारी दुचाकीने पळवून नेले. जातांना पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरतांना मुलीच्या मैत्रिणींनी बघीतले होते. त्यांना हुलकावणी देत तिघे निसटले.

वाचा- जळगाव जिल्ह्यात ५३ हजार रुग्ण कोरोनातून झाले मुक्त ! -
 

घडल्या प्रकारात मुलगी संध्याकाळी उशिरा घरी न पेाचल्याने आई वडीलांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.दाखल गुन्ह्यात पेालिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत रात्रीतून तपासचक्रे कार्यान्वीत केली.  प्रकाश बावस्कर हा इंदौरकडे निघाल्याची खात्री होताच..पथकातील राजेंद्र पाटिल,कमलाकर बागुल,दिपक पाटील व तांत्रिक तज्ञ नरेंद्र वारुळे, विजय पाटिल अशांनी पिच्छा पुरवुन दिवस उजाडताच इंदौर येथे सुशिला नारायण भुसारी यांच्या घरातून देाघा संशयीतांना ताब्यात घेत पिडीतेची सुखरुप सुटका केली.   

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top