esakal | अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार-मंत्री जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Jayant Patil

अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार-मंत्री जयंत पाटील

sakal_logo
By
दीपक चौधरी

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प (Irrigation project) पूर्णत्वात येत असून, राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी एकनाथ खडसे (Eknath Khadse), ॲड. रोहिणी खडसे (Adv. Rohini Khadse) सतत प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे आम्ही सरकार म्हणून या योजनांना प्राधान्याने निधी देऊन पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil ) यांनी दिली.

हेही वाचा: हम तो डूबेंगे.. लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’- खडसे


तालुक्यातील वढोदा वनक्षेत्राच्या हद्दीतील गोरक्षगंगा नदीवर असलेल्या जोंधनखेडा कुंड धरणाचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसद्वारे तर प्रत्यक्षात धरण स्थळी माजी महसूल, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे - खेवलकर, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, गोटू महाजन, सरचिटणीस ईश्वर रहाणे, अशोक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रवादीला यश मिळेल
कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी आणि सांडव्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३० कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल माजी मंत्री खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील, ॲड. रोहिणी खडसे यांचा कुऱ्हा-वढोदा परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील म्हणाले, की ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाची गावखेड्यात ताकद वाढली असून, येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व सहकार क्षेत्रातील निवडणुकांत राष्ट्रवादीला यश मिळेल.
या वेळी ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर म्हणाल्या, की जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे २० ऑगस्टच्या बैठकीत निधीची मागणी केली होती. त्यावर त्यांनी तत्काळ ३० कोटी ८४ लाख निधीची तरतूद केली. नाथाभाऊ यांच्या शब्दाला सरकारमध्ये वजन असल्यानेच मागणी पूर्ण होऊ शकली.

हेही वाचा: Jalgaon : जमीनच फाटलीय... ठिगळे कुठे कुठे लावणार?


व्हिडीओ कॉन्फरसद्वारे मनोगत व्यक्त करताना जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, की खडसे हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुका सुजलाम् सुफलाम् व्हावा यासाठी बोदवड उपसा सिंचन योजना, कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना, जोंधनखेडा धरण व उत्तर महाराष्ट्रातील अनेक उपसा सिंचन योजना व धरणांची मुहूर्तमेढ रोवली. त्या पूर्ण होण्यासाठी सतत पाठपुरावा केला. जलसाठ्याचा कुऱ्हा परिसरातील साधारण १५ गावांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगतात एकनाथ खडसे म्हणाले, की पाटबंधारे मंत्री असताना गोरक्षगंगा नदीवरील कुंड धरणाला पर्यावरणाच्या वन विभागाच्या सर्व परवानग्या मिळवून देऊन धरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. भूमिपूजन ते जलपूजन करण्याचे भाग्य लाभलेला कदाचित मी पहिला व्यक्ती असेल. याचप्रमाणे मी जयंत पाटील यांना कुऱ्हा- वढोदा- इस्लामपूर प्रकल्पाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.


कार्यक्रमाला किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, राष्ट्रवादी सोशियल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, प्रवक्ता सेल जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, युवक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्ष रंजना कांडेलकर, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शिवा पाटील, मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष नंदकिशोर हिरोळे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, ज्येष्ठ नेते सुधाकर पाटील, रमेश पाटील, प्रा. डॉ. सुनील नेवे, अशोक लाडवंजारी, पंकज येवले, सय्यद असगर, माफदा तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, बोदवड गटनेते कैलास चौधरी, मधुकर राणे, सुभाष टोके, विलास धायडे, दशरथ कांडेलकर ,रामदास पाटील, कैलास पाटील, राजू माळी, विकास पाटील, प्रदीप साळुंखे, रवींद्र दांडगे, सुनील काटे, संदीप देशमुख, सुधाकर जावळे, दीपक मराठे, निळकंठ चौधरी, मेहबूब खान, डॉ. बी. सी. महाजन, नगरसेवक मस्तान कुरेशी आदी उपस्थित होते. दरम्यन, विशाल महाराज खोले यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच रवींद्र पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा: Jalgaon : अतिवृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली

..तर संपत्ती विरोधकांना दान करू : खडसे
एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर टीका केली. काहीही करा पण नाथाभाऊला जेलमध्ये टाका, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये धादांत खोटे आरोप करण्यात आले आहेत. आपण जेलमध्ये जायला घाबरत नाही. ‘चार दिन भरके आयेंगे, हम तो डूबेंगे लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’ असे ते म्हणाले. आयकर विभागाला सादर केलेल्या महितीपेक्षा जास्त मालमत्ता माझ्याकडे मिळाल्यास मी ती आरोप करणाऱ्या विरोधकांना दान करेल, असेही ते माजीमंत्री आमदार गिरीश महाजन यांचे नाव न घेता म्हणाले.

loading image
go to top