रावेर, यावल तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या तंबूत !  

रावेर, यावल तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या तंबूत !  

मुक्ताईनगर : निंभोरा स्टेशन ता रावेर ,थोरगव्हाण ता यावल आणि यावल येथिल भाजप आणि सहकार क्षेत्रातील विविध कार्यकर्त्यांनी आज माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे आणि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी मार्गदर्शन करताना एकनाथराव खडसे म्हणाले गेले चाळीस वर्षे मी भाजप पक्ष वाढीसाठी जिवापाड मेहनत घेतली मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले.
आपल्या भागात केळी हे प्रमुख पिक आहे ,कृषी मंत्री असताना केळी पिक विम्याच्या निकषांमध्ये बदल करून केळी उत्पादकांना केळी पिक विम्याचा लाभ मिळवून दिला, केळी पिकावर संशोधन व्हावे आणि शेतकऱ्यांना कमी किंमतीत केळीची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध व्हावे यासाठी हिंगोणे येथे केळी संशोधन केंद्र मंजुर केले होते, त्याचबरोबर फळ संशोधन केंद्र, शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते. आता सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे प्रकल्प पूर्णत्वास न्यायचे आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार करून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे त्यासाठी नवे जुने सर्वांनी एकजुटीनेमेहनत घ्यायची आहे असे म्हणाले.

यावेळी बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोडे,दुर्गादास पाटील ,बि सी सेल तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे, माजी सभापती राजू माळी,ता उपाध्यक्ष संदीप खाचणे,वाय डी पाटील , दूध संघ संचालक सुभाष टोके, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस अरुण पाटील, बाळू शिंपी, कमलाकर पाटील, सुभाष खाटीक, सुनिलभाऊ काटे ,पांडुरंग नाफडे उपस्थित होते  

यांनी घेतला प्रवेश
राष्ट्रवादीत प्रवेश घेणाऱयांमध्ये निंभोरा स्टेशन येथील भाजप शहराध्यक्ष प्रभाकर शंकर सोनवणे,सचिन महाले, मुन्ना पिंजारी, आरिफ खान,जितेंद्र सोनवणे, अविनाश संतोष भालेराव, युगल धनराज राणे, वैभव अनंता भोगे, चेतन रविंद्र नेमाडे, प्रतिक नितीन भंगाळे, पुर्वेश युवराज बोरसे, हितेश शंकर चौधरी, किरण अनिल कोंडे, जयेश कैलास चौधरी, मोहन गिरधर भंगाळे, गिरीश रमेश नेहते, गुणवंत नेमचंद्र भंगाळे, अभिजीत जोशी, संदीप खाचणे, विशाल तायडे, आरिफ खान बाबु खान, मुन्ना पिंजारी, सुधाकर भंगाळे, जितेंद्र सोनवणे, दिपक सोनवणे, रवी भोगे, राज खाटीक, प्रशांत काठोके, भुवन बोरोले, चेतन बोरनारे, चेतन भंगाळे, शंकर बोरोले, मनोहर तायडे, किशोर चौधरी, सचिन कोळी, रतन वाघ, शाहरुख खान, राकेश सपकाळे, सुभाष पाटील संदीप कोळी, अक्रम शेख, थोरगव्हाण येथील बापुभाऊ पाटील, विकास शालीक पाटील, किशोर पाटील, विलास सदाशिव पाटील, धनसिंग पाटील, जुलाल पाटील, कैलास पाटील, सचिन पाटील, रमेश मुरलीधर चौधरी
तर यावल येथील मधुकर चौधरी, किशोर वानखेडे, अनिल कोलते, मांगो मेंबर, धनराज फालक, भुषण चौधरी, काशिनाथ कोळी, जयंत चोपडे यांचा समावेश आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com