वढोदा वनक्षेत्रातून पाच मांडूळ तस्कर गजाआड !

गजानन खिरडकर
Wednesday, 16 September 2020

परराज्यातील टोळ्या काळी हळद, नागमणी, दुतोंडी साप, शंखनाद, करंट भांडे, तिलस्मी खडा आदी घेण्यासाठी येत आहेत. त्यात परराज्यातून आलेल्या या लोकांची लूटमार केली जाते.

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : जळगाव येथील फिरत्या पोलिसपथकाने सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महालखेडा गावालगत एका हॉटेलजवळ पाच संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मांडूळ जातीच्या सापासह तीन दुचाकी जप्त केल्या. यातील दोन संशयित फरारी झाले. पाचही संशयितांना कुऱ्हा येथील वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. 

 

आवर्जून वाचा ः अरे व्वा ! जळगाव परिसरात आहे फुलपाखरांच्या ५५ विविध प्रजाती
 

संशयित प्रदीप धनराज चव्हाण, प्रवीण अमरदीप खिल्लारे, भागवत सुनील डुकरे, पंकज रामसिंग चव्हाण व अरविंद माणिकराव कांडेलकर यांना अटक केली आहे. दोन संशयित फरारी झाले आहेत. वनक्षेत्रात पट्टेदार वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, हरीण, नीलगाय या प्राण्यांचा मोठा अधिवास आहे. ही कारवाई उपवन संरक्षक (जळगाव) व्ही. व्ही. होसिंग, फिरत्या पथकाचे वनाधिकारी राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वढोदा वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल डिगंबर पाचपांडे, वनरक्षक विजय अहिरे, ज्ञानोबा धुळगंडे, राम आसुरे यांनी केली. सहाय्यक वनसरंक्षक चि. रा. कामडे तपास करीत आहेत. 

 

परराज्यातील टोळ्या 
संशयितांना मुक्ताईनगर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १७ सप्टेंबरला वन कोठडी दिली. कुऱ्हा वढोदा परिसरात कोरोना काळातही परराज्यातील टोळ्या काळी हळद, नागमणी, दुतोंडी साप, शंखनाद, करंट भांडे, तिलस्मी खडा आदी घेण्यासाठी येत आहेत. त्यात परराज्यातून आलेल्या या लोकांची लूटमार केली जाते. यात काही लोक पुढे येतात, तर काही टोळ्या निघून जातात. यूट्यूबवर बनावट व्हिडिओ अपलोड करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktaeenagar Police arrested for smuggling snake in Vadodara forest area