esakal | कौटुंबिक वाद..आणि मेहुण्याने शालकाला झोपेत संपवीले!
sakal

बोलून बातमी शोधा

crime

कौटुंबिक वाद..आणि मेहुण्याने शालकाला झोपेत संपवीले!

sakal_logo
By
दीपक चौधरी


मुक्ताईनगर ः येथील तरुणांची (young man) डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना आज दि 16 रोजी उघडकीस आली असून पाहुण्याने शालकाचा खून (Murder) केल्याचं संशय असल्याचे समजते थरारक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. (muktainagar city sisters husband kill by young man)

हेही वाचा: शंभर रुपये द्या..पोलिस ठाण्यात युवकाचा धिंगाणा!याबाबत वृत्त असे की, शहरातील भुसावळ रोडवर कोर्टाजवळ सेवानिवृत्त शिक्षक वामन ठोसरे राहतात त्याचा मुलीचा सुमारे चार वर्षांपूर्वी चुंचाळे (ता. यावल) येथील विजय सावकारे याच्याशी लग्न झाले होते. मात्र यानंतर त्यांचे कौटुंबिक वाद झाले होते. तथापि, अलीकडे सलोखा होऊन त्याची बहिण सासरी नांदत होती.


सासूरवाडीला आला आणि गोंधळ घातला
काल रात्री विजय सावकारे हा सासूरवाडीला आला. येथे त्याने गोंधळ घातला. मात्र हा वाद मिटल्यानंतर वामन ठसरे यांचा मुलगा विशाल ठोसरे हे आपल्या पाहुण्यासोबत झोपले होते. दरम्यान, आज पहाट विशाल ठोसरे यांच्या आईला जाग आली असता त्यांना आपल्या मुलाच्या डोक्यात कुर्‍हाडीचे घाव घातले असून यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसले. त्यांनी घरातील इतर मंडळीला उठविले. विशाल ठोसरे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. तर, विजय सावकारे हे घरात आढळून न आल्याने त्यांनीच हा खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: हतनूर धरणाचे १० दरवाजे पूर्ण उघडले; सतर्कतेचा इशारा

घटनास्थळी पोलिसांची धाव

या खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. शेवटचे वृत्त आले तोवर या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

loading image