अरेच्चा...कुत्र्यांनीच पाडला बिबट्याचा फडशा

bibtya
bibtya

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : येथून जवळच असलेल्या भोटा (ता. मुक्ताईनगर) शेती शिवारात आज (ता. १२) सकाळी दहाच्या सुमारास बिबट्याच्या बछड्यावर गावठी सात ते आठ कुत्र्यांनी हल्ला करून ठार केले आहे.
सकाळी शेती शिवारात शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे करत होते. अचानक सात आठ गावठी कुत्रे पळताना दिसले; यावेळी त्यांनी पाहणी केली असता, बिबट्याच्या बछड्याच्या मागे ती लागलेली होती. कुत्र्यांच्या तावडीतून जीव वाचविण्यासाठी बछडा निंबाच्या झाडावर सुध्दा चढला. मात्र, त्या आधी कुत्र्यांनी त्याचे मानेवर व मागेच्या डाव्या पायाचे लचके तोडले होते. शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावून वनविभागाला माहिती दिली. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, वनपाल ए.जी. पाटील, वनपाल डिगंबर पाचपांडे, वनरक्षक राम आसुरे, डि.एम. धुळगुंडे, विजय अहिरे, रहिम तडवी, सुप्रिया देवरे, मनिषा मोरे आदी उपस्थित झाले. यावेळी बिबट्याचे बछडे शेतातील ठिबकच्या नळ्यांमध्ये लपून बसले होते. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. भांगरे, भगवान पारधी यांनी पाहणी केली. मात्र काही वेळाने त्याची प्राणज्योत मालवली. याप्रसंगी जळगाव चे वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई, फिरते पथकाचे वनपाल राजकुमार ठाकरे, शिग्र बचाव दलाचे गणेश गवळी यांनी सुध्दा घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र तोपर्यंत ५ ते ६ महिन्याच्या बछड्याने आपला जिव सोडला होता. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
दोन बछड्यांचा जन्म
१४ जानेवारी रोजी या शिवाराला लागुन असलेल्या रिगांव शेती शिवारात एका ऊसाच्या शेतात बिबट्याचे दोन नुकतेच जन्मलेले बछडे आढळून आले होते. त्यामधील हा एक असावा असा कयास लावण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com