नंदुरबारः४५ ग्रामपंचायतीच्या ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Election

नंदुरबारः४५ ग्रामपंचायतीच्या ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील ४५ ग्रामपंचायतीमधील (Gram Panchayat) ५७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर केला आहे.

हेही वाचा: ‘मोर’वरील सौरऊर्जा प्रकल्पाला लवकरच मंजुरी-मंत्री नितीन राऊत

पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : अक्राणी तालुक्यातील वरेखेडी बुद्रुक, अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बुद्रुक, सोनवल त.बो., मनरद, कोठली त. सा., कानडी त. श., श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त. सा., वर्ढे त. श., नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर, तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगाव, करणखेडा, बोराळा, तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी.

हेही वाचा: लग्न करा धुमधडाक्यात..यंदा कितीही पाहुण्यांना बोलवा लग्नाला

पोटनिवडणूक कार्यक्रम
नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा सोमवार (ता. २२) पर्यंत राहील. तहसीलदार सोमवारी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील, नमुना ‘अ’मध्ये नमूद ठिकाणी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबरपर्यंत सकाळी११ ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. ७ डिसेंबरला सकाळी अकराला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. ९ डिसेंबरला दुपारी तीनपर्यंत माघारी घेता येईल. ९ डिसेंबरला दुपारी तीननंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. २१ डिसेंबरला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होईल, तर २२ डिसेंबरला मतमोजणीचे ठिकाण व वेळ तहसीलदार निश्चित करतील. त्यानुसार मतमोजणी होईल. निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २७ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. मतदारांवर प्रभाव टाकणारी कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहितेत करता येणार नाही, असे उपजिल्हाधिकारी श्रीमती कल्पना निळ-ठुबे यांनी कळविले आहे.

loading image
go to top