‘मोर’वरील सौरऊर्जा प्रकल्पाला लवकरच मंजुरी-मंत्री नितीन राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Solar energy project

‘मोर’वरील सौरऊर्जा प्रकल्पाला लवकरच मंजुरी-मंत्री नितीन राऊत

sakal_logo
By
प्रदिप वैद्य


रावेर/फैजपूर : मोर मध्यम प्रकल्पावर (Mor Dam) सौरऊर्जा प्रकल्प (Solar energy project) शासकीय जमिनीवर उभारण्याबाबत तसेच पाल व जामन्या याठिकाणी सोलर सबस्टेशन मंजूर करण्यासंदर्भात आमदार शिरीष चौधरी (MLA Shirish Chaudhary) यांच्या विनंतीनुसार मंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut)यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

हेही वाचा: लग्न करा धुमधडाक्यात..यंदा कितीही पाहुण्यांना बोलवा लग्नाला

त्या बैठकीत मंत्री राऊत, आमदार चौधरी, अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल), प्रधान सचिव (ऊर्जा), प्रधान सचिव (जलसंपदा), महासंचालक (महाऊर्जा पुणे), संजय मरूडकर महाजनको, सुनील इंगळे, मुख्य अभियंता, सौर प्रकल्प, मुंबई यांच्या उपस्थितीत पार पडली. मोर माध्यम प्रकल्पाच्या संपादित जमिनीपैकी १५० एकर जमिनीवर ५० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पास लवकरात लवकर मंजुरी देणार असल्याचे मंत्री राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा: जळगाव : धुळे-चोपडा राज्य मागार्वरील अतिक्रमणे हटवली


तसेच मतदारसंघातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागात पावसाळ्यात वादळाने मुख्य वाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्याची दुरुस्ती करणे जिकरीचे होते. त्या मुळे या भागातील पाल व जामन्या येथे सोलर सबस्टेशन तत्काळ मंजूर करावे, १ एप्रिल २०२१ पासून आजपर्यंत सावदा विभागात ७४ ट्रान्स्फॉर्मर चोरीला गेले. यातील चार ट्रान्स्फॉर्मर नवीन सावदा विभागाला मिळालेले आहेत. ७० नवीन ट्रान्स्फॉर्मर व ऑइल देण्याचे व ते सावदा विभागाला थेट पाठविण्याचे आश्वासन नितीन राऊत यांनी आमदार चौधरी यांना दिले.

loading image
go to top