गरिब, वृध्द निराधारांना दिलासा 

senior citizen
senior citizen

तळोदा : एकीकडे शासनाचा आर्थिक मदतीचा लाभ देणाऱ्या योजनांचा निधी मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी लाभार्थ्यांना बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहेत तर दुसरीकडे तळोदयातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी योजनेचा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल ते जून अशा तीन महिन्यांचे अनुदान जमा करून महसूल विभागाने त्यांना सुखद असा अनुभव दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा कठीण काळात गरीब, वृद्ध, विधवा लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

तळोदा तालुक्यातील श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजनेतील, संजय गांधी निराधार योजनेतील व इंदिरा गांधी योजनतील लाभार्थ्यांचे एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांचे प्रत्येकी तीन हजार रुपये प्रत्येक लाभार्त्यांचा बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील ५९ लाभार्थ्यांसाठी १ लक्ष ६८ हजार ६०० रुपये, संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुसूचित जमातीतील १५०९ लाभार्थ्यांसाठी ४२ लक्ष ८२ हजार ८०० रुपये तसेच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सर्वसाधारण गटातील १५०२ लाभार्थ्यांसाठी ३६ लक्ष ८८ हजार ८०० रुपये, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील ९११ लाभार्थ्यांसाठी २२ लक्ष १८ हजार ८०० रुपये व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत अनुसूचित जमातीतील ६८२६ लाभार्थ्यांसाठी १६ लक्ष ४५ हजार ४४० रुपये त्याचप्रमाणे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ८९२५ लाभार्थ्यांसाठी १ कोटी ४२ लक्ष ८० हजार रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ५९३ लाभार्थ्यांसाठी ११ लक्ष २६ हजार ७०० रुपये आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ६० लाभार्थ्यांसाठी १ लक्ष १४ हजार रुपये असा तीन महिन्यांच्या निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. 
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सर्वसाधारण गटातील लाभार्त्यांच्या बँक खात्यावर एप्रिल व मे या दोन महिन्याची ११ लाख ८० हजार ६०० रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. याप्रकारे संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचा एकूण ११ हजार ४३५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर एकूण १ कोटी ३७ लक्ष ७५ हजार ३४० रुपये आणि इंदिरा गांधी योजनेचा एकूण ९ हजार ५७८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एकूण १ कोटी ५५ लक्ष २० हजार ७०० रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे संबंधित लाभार्थ्यांना कोरोनाचा काळात मोठी मदत होणार आहे.... 
 
सानुग्रह अनुदानाचाही फायदा 
कोरोनाचा पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेचा लाभार्थ्यांना, त्यांना नियमितपणे मिळणाऱ्या अनुदान व्यतिरिक्त एप्रिल महिन्यात ५०० रुपये व मे महिन्यात ५०० असे एकूण १००० रुपये अधिकचे मिळणार आहेत. ती रक्कम सुध्दा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com