esakal | पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा
sakal

बोलून बातमी शोधा

पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा

पतंगाचा खेळ प्रिय आहे अनेक ठिकाणी तर अगदी राष्ट्रीय खेळ प्रिय आहे. अनेक ठिकाणी तर अगदी राष्ट्रीय खेळ आहे.

पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा

sakal_logo
By
किशोर पाटील

वावडेः दिवाळीनंतर मुलांना वेध लागतात पतंग उडविण्याचे नववर्षाच्या उत्साहात जानेवारीत येणाऱ्या मकरसंक्रांतीला पतंग पुढे सर्व खेळ फिके ठरतात या पतंगाची जन्मकथा ही मोठी रोचक आहे.

आवश्य वाचा- केंद्र सरकारकडून दिलासा; आठवडाभरात मका खरेदी पुन्हा सुरू होणार 

पतंगाचा इतिहास

चीनमधील लोक कथेनुसार एका शेतकऱ्याने त्याची हवेमुळे उडणारी टोपी दोरीने खेचून धरली हीच पतंगाची सुरुवात होती आशिया खंडात पतंगा विषयी पौराणिक संदर्भ आढळतात. ग्रीक शास्त्रज्ञ  टरेनटमचा‌ आर्काईटस  इसवी सन पूर्व पाचव्या शतकात पतंगाचा शोध लावल्याचा उल्लेख आढळतो. चिनी सेनानी हानसिन याने इ.स. पूर्व २०६ मध्ये युद्धात पतंगाचा वापर केला .कोरियन ,चिनी, जपानी , लोकात पतंगाचा खेळ प्रिय आहे अनेक ठिकाणी तर अगदी राष्ट्रीय खेळ प्रिय आहे. अनेक ठिकाणी तर अगदी राष्ट्रीय खेळ आहे. रात्री घरावर पतंग उडविल्यास भूते दूर जात असल्याचे पूर्वी म्हटले जात होते. बेंजामिन फ्रेंनक्लिनया शास्त्रज्ञाने ढगांमध्ये विद्युत ऊर्जा असते हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते.

 कोरियन सेनापतीने दिवा जोडलेला पतंग आकाशात सोडून आपल्या सैनिकांना स्फूर्ति दिली हेस्टींगजच्या लढाईतही इशारे देण्यासाठी पतंगाचा वापर झाला समुद्रात वाहून गेलेले तसेच बर्फात अडकलेल्या व्यक्तीला उचलण्यासाठी पतंगाचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो.१७७२ मध्ये पतंगाला बांधलेल्या लोखंडी वस्तूवर वादळी वीज आकर्षित करण्याचा प्रयोग झाला होता. १८९४ मध्ये के.बेडन पोचेल याने १०.९७ मीटर तर उंच पतंग बनवून त्याच्या सहाय्याने माणसाला हवेत उडविले.

आवश्य वाचा- रुग्णसेवेसाठी जळगावात धावणार ‘लाइफलाइन’ 
 

पाणबुड्यांच्या टेहळणीसाठी वापर

दुसऱ्या महायुद्धात पाणबुड्यांच्या टेहळणीसाठी पतंगच वापरला. मोत्सू व कुंगशू- फान (चीन पाचवे शतक),लारैनस हारग्रेव्ह (ऑस्ट्रेलिया १८५०), अलेक्झांडर ग्रॅहम बेल (अमेरिका १८४७), फ्लेचर बेडन पोएल (इंग्लंड१८६०), फ्रान्सिस रोगॅलो व डोमिना जॅल्बर्ट (अमेरिका) हे पतंग संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत चीनमध्ये नव्या महिन्यातील नववा दिवस हा पतंगाचा मानला जातो.

शुभ, स्वातंत्र्य ,आनंदाचे प्रतीक

मोगलांच्या काळात पतंगाचा छंद जोपासला गेला उत्तर भारतात हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात संक्रांतीला हा उत्सव साजरा करतात पतंग हे शुभ स्वातंत्र्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी या प्रजासत्ताक दिनी पतंग उडविण्याची प्रथा आहे भारतात मात्र बहुतेक ठिकाणी संक्रांतीलाच पतंग उडविला  जातो. पतंग उडविण्यासाठी वाऱ्याचा वेग तासाला १२.८७ ते ३२.१८ किलोमीटर लागतो त्यापेक्षा वेग कमी असेल तर तो योग्य मानला जात नाही अमेरिकेत पतंगाचे सामने रंगतात.


आरोग्यासाठी असाही फायदा

संक्रांतीच्या काळात ऊन कमी असते जास्त थंडीमुळे शरीराला स्थूलपणा येतो या काळात शरीराची हालचाल व्हावी सूर्य किरणे अंगावर पडावीत यासाठी पतंग उडविला जातो वैज्ञानिक दृष्ट्या उत्तरायणातील उष्णतेमुळे आजार दूर होतात अशा परिस्थितीत जेव्हा लोक छतावर येऊन ऊन घेतात , त्यातून सूर्यकिरण अंगावर पडतात.

हेही वाचा- धुळे ग्रामीणमध्ये पाच, तर साक्रीत दोन ग्रामपंचायतींवर भगवा 

असा बनतो चिनी मांजा

पॉलीमाइड ,पॉलिस्टर ,पॉलिथिन, पॉलीव्हीनिल ,क्लोराईड, पॉलीव्हीनल अल्कोहोल, कोपॅलिमर.पाॅलिप्रोपिलिन आदी . रसायनांपासून चिनी मांजा तयार होतो असा मजबूत धागा मासेमारीसाठी वापरतात . चीनने या मांज्याची  विक्री जगभर करून बाजारपेठा काबीज केल्या सध्या या मांजावर बंदी असली तरी तो मुलांच्या हातात दिसतो भारतीय मांजा नैसर्गिक कापूस, वनस्पती, कीटक यांपासून तयार करतात त्यात डिंक, काचेचा चुरा, रंग शिजवलेल्या भारताचाही वापर केला जातो.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image