पाचोरा येथे घरफोडी, ६८ हजारांचा ऐवज लंपास 

चंद्रकांत चौधरी
Sunday, 6 December 2020

पाचोरा येथे बळीरामनगरात राहणारे नरेंद्र गायकवाड हे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते बळिराम नगरात वास्तव्यास असून, कामानिमित्त शुक्रवारी बाहेरगावी गेले होते.

पाचोरा (जळगाव) : येथील बळिरामनगर भागात शनिवारी (ता. ५) रात्री चोरट्यांनी घरफोडी करून घरातील सोन्याचे दागिने व ६८ हजार ५०० रुपयांची रोकड असा ऐवज लांबवला. घरमालकाच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

नक्‍की वाचा : हृदयाचा ठोका चुकला..धावत्‍या रेल्‍वेतून प्लॅटफॉर्मवर पडली महिला

पाचोरा येथे बळीरामनगरात राहणारे नरेंद्र गायकवाड हे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. ते बळिराम नगरात वास्तव्यास असून, कामानिमित्त शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. शनिवारी रात्री ते घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरी झाल्याचे लक्षात आले. 

सोन्याचे दागिने आणि रोकड
घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील सोन्याची ३० हजारांची चैन, १५ हजारांची अंगठी, १३ हजार ५०० रुपयांचे कानातील टोंगल व दहा हजारांची रोकड, असा ६८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. त्यांच्या घरातील प्रत्येक रूममधील सामान अस्ताव्यस्त फेकले असून, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व पंचनामा केला. नरेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. हवालदार अजय मालचे पुढील तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora late night closed home and 68 thousand robbery