
पारोळा : बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाची जलपातळी मोठ्या प्रमाणात वाढली होती.यामुळे धरणातुन नदीद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात होता.दरम्यान उजव्या कालव्यातुन पाणी सोडुन कंकराज लघुप्रकल्प भरण्यात यावा अशी मागणी कंकराजचे माजी सरपंच प्रेमानंद भटा पाटील,शेवगे सरपंच आशा पाटील यांचेसह लघुप्रकल्पावर अवलंबुन असलेल्या गावांनी केली होती.
या पाश्वभुमीवर बोरी धरणातुन 1 जुलै रोजी बोरी उजव्या कालव्याने पाणी सोडण्यात आले होते. आज तब्बल 30 दिवसानंतर कंकराज लघुप्रकल्प बोरी नदीच्या जलदानातुन तुडुंब भरल्याची माहीती शाखा अधिकारी अजिंक्य पाटील,पी जे काकडे,स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व्ही एम पाटील यांनी सकाळला दिली.
मागील वर्षापेक्षा यंदा बोरी धरणालगतचे विंचुर,आर्वी,निमगुळ परिसरात सुरुवातीपासुन जोरदार पाऊस झाल्याने यंदा एक महीना अगोदर बोरी धरणाची पाणी पातळी वाढली.दरम्यान धरणाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने धरणाचे टप्प्याने दरवाजे उघडुन पाण्याचा विसर्ग नदीद्वारे करण्यात आला होता.
कंकराज लघुप्रकल्पाचे 32 कि.मी अंतर 30 दिवसात पुर्ण
बोरी धरण उजवा कालवा ते कंकराज लघुप्रकल्पाचे अंतर साधारणपणे 32 कि.मी असुन बोरी उजवा कालवा मार्गातुन मेहु- टेहु- शिवल्या मार्गे- हायवे क्राँस करुन- शेवगेलगत कंकराज लघुप्रकल्प कालव्यातुन तब्बल 30 दिवसांनी प्रकल्प पुर्णपणे भरला गेला.-
कंकराज लघुप्रकल्पामुळे सिंचनाचा व पाण्याचा प्रश्न मार्गी
या लघुप्रकल्पावर कंकराज,शेवगे व भिलाली गाव अवलंबुन असुन प्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे या गावाचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
यावेळी नाना पाटील,शशिकांत पाटील,(कालवा निरीक्षक)अतुल पाटील यांचेसह पाचबंधारे विभागातील कर्मचारी यांनी प्रकल्प भरणेकामी सहकार्य केले.
चौकट - तालुक्यात बोरी प्रकल्प,भोकरबारी मध्यम प्रकल्प सह लघुप्रकल्प आहेत.यंदा पाहीजे त्या प्रमाणात तालुक्यातील पाचही मंडळात समाधानकारक पाऊस झाला नाही.मात्र बोरी प्रकल्प क्षेत्रसह गिरणा नदीची पाणी पातळी वाढ झाल्याने तालुक्यातील बहुतांशी प्रकल्पात पाणी साठा वाढण्यास मदत होत आहे.
तालुक्यातील प्रकल्प व पाण्याची आकडेवारी टक्यात
प्रकल्पाचे नाव पाण्याची टक्केवारीव
म्हसवा ल.पा.
टक्केवारी — 50 %
शिरसमणी ल.पा.
टक्केवारी —1.50 %
पिंपळकोठा–भोलाने ल.पा.
टक्केवारी — 1oo %
भोकरबारी म.प्र.
टक्केवारी — 12 %
कंकराज ल.पा.
टक्केवारी — 100 %
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.