esakal | बोरी नदी पात्रात केमिकल मिश्रीत पाणी..गावकरी झाले अचंबित
sakal

बोलून बातमी शोधा

Bori River

बोरी नदी पात्रात केमिकल मिश्रीत पाणी..गावकरी झाले अचंबित

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा ः बहादरपूर (ता. पारोळा) येथील बोरी नदी (Bori River) पात्रात आज सकाळच्या सुमारास बरेच जण आंघोळीला गेले असता त्यांच्या अंगाला केमिकल (Chemical) लागलेले दिसून आले. आणि सदर बाब त्यांनी सरपंच बापू सैंदाणे, उपसरंच शालिग्राम बडगुजर यांना सांगितली असता त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन पाहणी केली असता नदीपात्रात केमिकल युक्तपाणी येत असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरीत बहादरपूर तलाठी यांना बोलावून सदर बाब लक्षात आणून दिली.

हेही वाचा: बाप्पाचे जल्लोषात स्वागत..सलग दुसऱ्यावर्षी ढोल-ताशांचा गजर नाही

बोरी नदीपात्रात काही जण आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ केल्यानंतर काहींच्या अंगाला हे केमीकल लागल्याने अंगाला खाज सुटू लागली. नेमकं हे केमिकल कोणी टाकले, नदीपात्रात का सोडले ? याबाबत ग्रामस्थांना प्रश्ने पडले आहे. याबाबत प्रशासनाकडुन याबाबत माहीती घेणे सुरु आहे. अज्ञातांनी सोडलेले हे रसायन मुक्या प्राण्यांना तसेच व्यक्तींना देखील धोक्याचे असल्याचे यावेळी निदर्शनास आले नेमकं हे केमिकल आहे की नॅशनल हायवे क्रमांक 6 वर विकले जाणारे बोगस डिझेल आहे. अशी चर्चा सध्या गावात जोरदार सुरू आहे मात्र सकाळपासून एकच गावात चर्चेचा विषय ठरला तो बोरी नदीपात्रात आलेल्या केमिकलचा.

हेही वाचा: ३२ गावांचा प्रश्न..शेतकरी करणार आमदारांच्या निवासस्थानासमोर उपोषण

केमिकल नाही बोगस बायोडिझेल

बोरी नदीपात्रात सदर रसायन केमिकल नसुन नॅशनल हायवे क्रमांक 6 वर विकले जाणारे बोगस बायोडिझेल आहे. ट्रॅक्टरच्या टँकरद्वारे बोगस बायोडिझेलची विक्री हॉटेलवर होते. त्यांनी रात्री बोगस डिझेल नदीपात्रात सोडले असावे असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला. बायोडिझेल विकणारी टोळी कोणती आणि यांच्या मोरक्या कोण याचा योग्य छडा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

loading image
go to top