esakal | बाप्पाचे जल्लोषात स्वागत..सलग दुसऱ्यावर्षी ढोल-ताशांचा गजर नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpati agman

बाप्पाचे जल्लोषात स्वागत..सलग दुसऱ्यावर्षी ढोल-ताशांचा गजर नाही

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव ः गणपती बाप्पा मोरया....च्या गजरात आज शहरासह जिल्ह्यात श्री गणेशाचे ( Ganesh Festival) स्वागत करण्यात आले. घरगुतीसह सार्वजनिक गणेश मंडळात आज श्रींच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली. गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे यंदाही सलग दुसऱ्या वर्षी ‘ना ढोल..ना ताशे...ना वाद्यांचा गजर, ना मिरवणूका...’ अशाही वातावरणात अतिशय जल्लोष व भक्तीमय वातावरणात आज श्रीगणरायाची स्थापना करण्यात आली. गणेश मुर्तीसह विविध साहित्य घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी ( Markets Large crowds) होती. सामाजीक अंतराचे भान नसल्यागत सर्वजण होते.

हेही वाचा: राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतन वाढ


श्रीगणेश मुर्तीसह पुजेच्या साहित्यांची दुकाने आज टॉवरचौक परिसर ते गांधी मार्केट, सुभाष चौक परिसर, उपनगरातील कालिकामाता चौक, अजिंठा चौफुली, गणेश कॉलनी, महाबळ कॉलनी, शिवकॉलनी, पिंप्राळा आदी परिसरात थाटण्यात आली होती. सकाळ पासूनच केळीचे खोड, दुर्वा, श्री गणेश मुर्ती, पुजा, नारळ, गुलाल, साखरमिश्रीत खोबरे, मुर्तीसाठी विविध प्रकारचे हार, माळा, तोरण, श्री गणेशाच्या स्वागताच्या लहान कमानी, महिरपी लहान आसाने खरेदीसाठी गर्दी झाली होती. सोबत मोदक, पेढे यांनाही आज प्रचंड मागणी होती.

हेही वाचा: भारतातील ५ स्थळे जी दिसतात परदेशासारखी..तुम्ही नक्की भेट द्या !


मिरवणूकीवर बंदी असल्याने गणेश मंडळांनी आपापल्या सजविलेल्या वाहनांतून जल्लोषात श्री गणेशाची मुर्ती नेली. मुर्तीची उंची चार फुटापेक्षा लहान असल्याची सक्ती असल्याने सर्वच मुर्ती या आकारात मात्र आकर्षक रंगसंगीत व विविध आकारातील विक्रीस हेात्या. अनेक ठिकाणी नागरिकांनी शाडू मातीपासून बनविलेल्या मुर्ती खरेदीवर भर दिला.

हेही वाचा: ३२ गावांचा प्रश्न..शेतकरी करणार आमदारांच्या निवासस्थानासमोर उपोषण


ऑनलाईन दर्शनाची सक्ती.
गणेशोत्सव काळात भावीकांना दर्शनासाठी ऑनलाईन पध्दतीनेच दर्शन घेवू द्यावे. मंडप येवून श्रीगणेशाचे मुखदर्शन किंवा मंडपात येवून दर्शन घेण्यास प्रतिबिंध करण्यात येत असून दर्शन ऑनलाइन पध्दतीने देण्यात यावे, अशा सूचना शासनाचे असून त्याचे पालन करण्याची जबाबदारी महापालिका, पोलिस, स्थानीक प्रशासनाने करावे अशा सूचना अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी दिल्या आहेत.

loading image
go to top