esakal | बोरी धरण ओव्हर फ्लो,15 दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

Bori Dam

बोरी धरण ओव्हर फ्लो,15 दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : मंगळवार ता,31 रोजी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने बोरी धरणाची (Bori Dam) पाणी पातळी 267.14 मीटर असुन धरण ओव्हर फ्लो (Dam overflow) झाल्याने सुरक्षितेच्या दृष्टीने सकाळी 4.15 वाजता धरणाचे 2 दरवाजे 0.15 मीटर तर 13 दरवाजे 0.30 मी ने उघडुन नदीपात्रात 11940 क्युसेस पाण्याचा विसर्ग (Discharge of water) सुरु आहे. त्यामुळे बोरी नदीला मोठा पुर आला असुन नदीकाठावरिल गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: ब्रेकिंगःकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यावर जमा होणार निधी

धरणाचे पाणी थेट तापीपात्रात

बोरी धरणातुन नदीद्वारे विसर्गीत होणारे पाणी हे तामसवाडी,टोळी,तरडी,मोंढाळे,उंदीरखेडा,विचखेडे,बहादरपुर,भिलाली व बहादरवाडी मार्ग अमळनेर तुन तापी पात्रात हे पाणी वाहत जाते. दरम्यान नदी परिसरात असलेली कालवे,पाटचार्या या तुडुंब भरल्या आहेत.

हेही वाचा: फागणे-तरसोदचे काम सहा महिन्यांत होणार पूर्ण-नितीन गडकरी

विहीरींना जलदान

बोरी नदीतुन विसर्गीत होणारे पाणी हे प्रवाहातुन वाहत असल्यामुळे नदी काठावरिल 7 ते 8 गावांच्या विहीरींना यामुळे जलदान मिळुन त्यांची पाणीपातळीत वाढ झालेली आहे.

loading image
go to top