कोरोनाच्या लसीकरणामुळे सर्वसामान्यांच्या मनातील भिती होणार दुर !

संजय पाटील 
Saturday, 16 January 2021

जिल्हा रुग्णालयाकडून योग्य ती माहिती मिळत नसल्याने आमदारांसह अधिकारी व मान्यवरांना किमान अर्धा तास ताटकळत उभे रहावे लागले.

पारोळा : जगभर थैमान घातलेल्या कोरोना संसर्गामुळे उद्योग क्षेत्रे बंद पडलीत.तर  सर्वसामान्य नागरिक पुर्णपणे भयभीत होवुन आता जगणे कठीण होईल या भितीने तो दैनंदिन दिनचर्या करित होता.या विषाणुचे उच्चाटन व्हावे, याबाबत दिलासा मिळावा म्हणुन शासनाने लसीकरण बाबत अनेक चिकीत्सा करुन ती विकसित केली.आणि आज अखेर विषाणुच्या लसीकरणास पुर्णविराम मिळत असुन ती प्रत्यक्षात अगोदर आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांना दिली जात आहे. यामुळे कोरोनाबाबत जी भिती सर्वसामान्य नागरिकात होती ती कुठेतरी कमी होण्यास मदत होणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.

आवश्य वाचा- कोरोनाला कायमचे हद्दपार करण्यासाठी लसीकरण उपयुक्त ठरेल

जिल्ह्यात 7 पैकी पारोळा येथे पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या 100 कर्मचार्यांना लसीचे डोस देण्यात आले. यावेळी लसीकरण कक्षाचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. लसीकरण कक्षाचे उद्धाटन आ चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रांत अधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अनिल गवांदे,पो नि लीलाधर कानडे,गटविकास अधिकारी एन आर पाटील,बाल विकास प्रकल्प अधिकारी बी बी वारूडकर ,जि प सदस्य रोहन सतीष पाटील आदी उपस्थित होते.

एस एम एस द्वारे सूचना
एस एम एस द्वारे दिल्या सूचना -ज्या 100 कर्मचार्यांना ता, 16 रोजी लसीकरण केले जाणार होते त्यांना ता, 15 रोजी जिल्हा रुग्णालयातून एस एसएस  द्वारे या बाबत माहिती देण्यात आली होती.

माहिती मिळत नसल्याने तात्कळत
दरम्यान सकाळी 9 ची वेळ दिलेली असताना सदर लसीकरण 10.40ला सुरू झाले .जिल्हा रुग्णालयाकडून योग्य ती माहिती मिळत नसल्याने आमदारांसह अधिकारी व मान्यवरांना किमान अर्धा तास ताटकळत उभे रहावे लागले.यावेळी लसीकरण करताना कर्मचारी यांचे ओळखपत्र घेणे ती एन्ट्री ऑन लाईन टाकणे ,लस दिल्या नंतर 30 मिनिटे त्यांना निरीक्षण कक्षात लक्ष ठेवणे ,त्यात ज्यांना चक्कर,मळमळ,उलट्या ,झाल्यास त्यांच्यावर उपचार करणे देखील काम दिले गेले होते.

आवश्य वाचा- शिजवलेले चिकन, उकडलेली अंडी खाणे पुर्णत: सुरक्षित; जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष सुरू 

काही उत्तरे अनुत्तरीत
यावेळी माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित डॉक्टरां च्या पथकास सदर लस ही कोणत्या कोव्हिड स्टेप साठी आहे तिची प्रतिकार शक्ती किती दिवस राहणार या बाबत मात्र डॉ च्या पथकास उत्तरे देता आले नाही.पारोळा तालुका  एकूण 400 डोस उपलब्ध झाले असून दुसऱ्या टप्प्यात तामसवाडी,शेळावे व शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 300 कर्मचारी यांना लसीकरण केले जाईल.अशी माहीती वैद्यकिय सुत्रांनी दिली आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola corona vaccinated center inauguration