बिगुल वाजताच कारभारींची मांदियाळी 

संजय पाटील
Wednesday, 16 December 2020

राजकारणाची पाठशाळा समजल्या जाणाऱ्या पारोळा तालुक्याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून, दिग्गजांची प्रतीक्षा पणाला लागणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.

पारोळा (जळगाव) : तालुक्यात ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल वाजला असून, यात १८८ प्रभागांत ५०६ सदस्य निवडून द्यायचे आहेत. यासाठी १५ जानेवारीला मतदान, तर १८ ला मतमोजणी होणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणाची पाठशाळा समजल्या जाणाऱ्या पारोळा तालुक्याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून, दिग्गजांची प्रतीक्षा पणाला लागणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. या ५८ ग्रामपंचायती सर्व पारोळा तालुक्यातील असल्या तरी यातील २१ ग्रामपंचायती अमळनेर विधानसभा मतदारसंघात, तर ३७ एरंडोल मतदारसंघात आहेत. 

अमळनेर मतदारसंघात... 
अमळनेर मतदारसंघात येणाऱ्या ग्रामपंचायती अशा : सुमठाणे, हिरापूर, भोकरबारी, भिलाली, इंधवे, भोलाने, शिरसोदे, रत्नापिंप्री, शेवगे बुद्रुक, शेळवे बुद्रुक, शेळावे खुर्द, बोदर्डे, वसंतनगर, आंबापिंप्री, महालपूर, दळवेल, बहादरपूर, जिराळी, पिंपळकोठा, चिखलोड बुद्रुक, कोळपिंप्री. 

एरंडोल मतदारसंघात... 
एरंडोल विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायती : विचखेडे, टेहू, चोरवड, पळासखेडे बुद्रुक, तरवाडे खुर्द, मुंदाने प्र. उ., टोळी, मुंदाने प्र. अ., देवगाव, मंगरुळ, करंजी बुद्रुक, नगाव, हनुमंतखेडे, जोगलखेडे, आडगाव, सावखेडे, पिंप्री प्र. उ., ढोली, वेल्हाणे खुर्द, मोरफळ, टिटवी, वसंतवाडी, शिरसमणी, रताळे, सांगवी, तामसवाडी, बोळे, उंदीरखेडे, विटनेर, सारवे बुद्रुक, बाभळेनाग, बाहुटे, पळासखेडेसीम, तरडी, शिवरे दिगर, करमाड खुर्द, करमाड बुद्रुक. 

पक्षीय बलाबल 
तालुक्यातील ग्रामपंचायतींवर शिवसेना व राष्ट्रवादी याच पक्षांची ताकत असून, राज्यातील महाविकास आघाडीत हे दोन्ही पक्षमित्र असले तरी किमान एरंडोल मतदारसंघात दोन्ही पक्षांत अजूनही जवळीक दिसून येत नाही. दोन्ही पक्षांचे लोकप्रतिनिधी राजकीय, सामाजिक व्यासपीठावर एकमेकास चिमटे घेत असल्याचे दाखले मिळाले आहेत, तर भाजपची ग्रामीण भागात अजूनही हवी तशी नाळ दिसून येत नाही. त्यामुळे मुख्य लढती या सेना व राष्ट्रवादी समर्थकांमध्येच दिसून येतील. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news parola gram panchayat election political leader wacth