Cotton Crop
Cotton Crop

पारोळा तालुक्यात अतिवृष्टीमूळे कापसाचे मोठे नुकसान

आशेवर शेतकऱ्याने भविष्याचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्नच राहून निराशा पदरी आल्याचे दिसुन येत आहे

पारोळा ःअतिवृष्टिमुळे तालुक्यातील (Heavy Rain) नगदी व पांढरे सोने म्हणुन ओळखले जाणारा कापुस (Cotton) पुर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मिळणारे उत्पन्न हे नसल्यासारखे झाल्यामुळे तालुक्याची आणेवारी 50 पैश्याच्या आत करुन तालुका ओला दुष्काळ म्हणुन जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) युवा जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी निवेदनातुन केली आहे.यावेळी विविध मागणीचे निवेदन तहसीलदार यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.

Cotton Crop
मुलाची आईला स्पेशल भेट;हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा केली पूर्ण

गेल्या काही दिवसा पासून सततच्या पावसामुळे कापुस पिकाची वाईट अवस्था झाली. परिणामी कापुस लाल पडला थ्रिव रोगाचा प्रार्दुभावमुळे कैर्या पचकु लागल्या.झाडे कोमेजून कापसाच्या कैऱ्या सडल्या. कैऱ्यांमधून पु सारखा दुर्गंध येत आहे. ज्या आशेवर शेतकऱ्याने भविष्याचे स्वप्न पाहिले होते ते स्वप्नच राहून निराशा पदरी आल्याचे दिसुन येत आहे.जगावे की मरावे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

संततधार पावसाने परिपक्क झालेल्या काही कैया बोंडातूनच झाडावर कोंब फुटू लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे . शेतकऱ्यावर उपसमारीची वेळ आलेली आहे . तरी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व तात्काळ सरसकट पंचनामे करून पिक विमा व नुकसान भरपाई द्यावी . व तालुक्याची आणेवारी 50 पैश्यांच्या आत लावावी.अशी मागणी करण्यात आली आहे.

Cotton Crop
चाळीत सडला कांदा; उत्पादकांचे नियोजन बिघडले

शेतकऱ्यांच्या मागण्या

पारोळा तालुका ओला दुष्काळ जाहिर करावा,कापूस , उडीद , मुग , मका , सोयाबीन ह्या पीकांचा सरसकट पिकविमा मंजूर करावा, हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपाई शासनाकडून देण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आमरण उपोषण करेल. अशा आशयाचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार पारोळा यांना दिले. निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, सुरेश पाटील, घनश्याम पाटील, नाना पवार, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, रणजीत पाटील, वाल्मीक पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com