शेतकऱ्यांना आनंद देणारे बोरी नदीचे झुळझुळ पाणी

शेतकऱ्यांना आनंद देणारे बोरी नदीचे झुळझुळ पाणी

पारोळा : जल व मृदसंधारण विभागाच्या अंतर्गत स्थानिक स्तर निधीतून खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून साकारलेला बंधारा ओव्हर फ्लो झाला असून या दोन बंधारे मधून झुळझुळ वाहणारे पाणी शेतकऱ्यांच्या मनाला आनंद देत असून या परिसरातील हजारो एकर शेतीला या पाण्याचा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दोन कोटी रुपये खर्चाचे दोन बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असून  यातून वाहणारे पाणी शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांना आनंद देणारे ठरत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात बंधाऱ्यांची मागणी होती खासदार उन्मेश  पाटील हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मदाधिक्याने निवडून आल्यानंतर तातडीने त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये याबाबत बैठक घेऊन हा बंधारा मंजूर करून घेतला होता. या बंधाऱ्याचे काम वेळेत पूर्ण झाल्याने  यंदाच्या पावसाळ्यात हा बंधारा ओव्हर फ्लो झाला असून यातून वाहणारे पाणी हे  परिसरातील बळीराजाला आनंद देणारे ठरले आहे.  खासदार उन्मेश पाटील यांच्या धडाडीचे शेतकऱ्यांनी  कौतुक केले आहे.


दोन कोटींचे दोन बंधारे पूर्ण.
या परिसरात उंदीरखेडा गावात दोन बंधारे बांधण्यात आले असून यातून मोंढाळे, पिंप्री, तरडी, टोळी, उंदीरखेडे, मुंदाणे, देवगाव परिसरातील तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी आजच वाढली आहे.यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून खासदार उन्मेश पाटील यांनी आमच्या शिवारात बंधारा बांधून दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

तरडी, उंदिरखेडा गावाचा पाणी प्रश्न सुटला
या बंधाऱ्याच्या कामाकरिता पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण  पवार व परिसरातील ग्रामस्थांनी मागणी लावून धरली होती.खासदार उन्मेश  पाटील यांनी बंधारा मंजूर करून घेतला होता या सर्व परिसरातील नागरिक शेतकऱ्यांनी खासदार उन्मेश पाटील यांचे आभार मानले आहेत.

पारोळा, पाचोरा, चाळीसगाव परिसरात 32 बंधारे.
 खासदार  पाटील यांच्या प्रयत्नातून उंदीरखेडा एक व उंदीरखेडा दोन, दरेगाव, बेलदारवाडी, भामरे, भोरस टाकळी प्र.दे., उंबरखेडे, वरखेडे, देवळी, रामनगर, मांदुरने, सायगाव, पिंपळवाड म्हाळसा अशी  सोळा बंधारे पहिल्या टप्प्यात पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्यात तामसवाडी, महाळपुर, पुनगाव, पिंपळवाड म्हाळसा, सायगाव ,बहाळ, नेरी, दुसखेडा ,संगमेश्वर, नाचणखेडा, टाकळी,पिंप्री प्र.भ.अशी सोळा बंधारे मंजूर झाले असून त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहेत.एकंदरीत बत्तीस बंधाऱ्यामुळे पाचोरा,  पारोळा, चाळीसगाव परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचा मोठा फायदा होणार असून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याने बारमाही पिके घेता येणार आहेत.
 

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com