esakal | कैरी बाजारात नागरिकांना "कोरोना'चा विसर 
sakal

बोलून बातमी शोधा

Crowd

सोमवार ते शनिवार कंटेन्मेंट झोन वगळता महामार्गालगतची दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येऊन रविवारी मात्र जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्वत्र बंदचे आवाहन करण्यात आले. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कैरी बाजार महामार्गालगत भरत असल्याने नागरिकांना "कोरोना'चा विसर पडला की काय? असे चित्र पाहावयास मिळाले.

कैरी बाजारात नागरिकांना "कोरोना'चा विसर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारोळा : शहरी व ग्रामीण भागातून "कोरोना'बाधितांचा आकडा रोजच वाढत आहे. "कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावाने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असताना नागरिकांना आवाहन करूनही गर्दी कमी न होता वाढतच दिसत असल्याने प्रशासनाने नागरिकांपुढे गुडघे टेकल्याचा प्रत्यय आज आला.

सोमवार ते शनिवार कंटेन्मेंट झोन वगळता महामार्गालगतची दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येऊन रविवारी मात्र जीवनावश्‍यक वस्तू वगळता सर्वत्र बंदचे आवाहन करण्यात आले. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कैरी बाजार महामार्गालगत भरत असल्याने नागरिकांना "कोरोना'चा विसर पडला की काय? असे चित्र पाहावयास मिळाले. एकीकडे "कोरोना'च्या प्रादुर्भावाने तालुका हतबल होत आहे. मात्र, बाहेरगावासह शहरातील कैरी व्यावसायिक व्यापाऱ्यांचे चांगभले होत असल्याने आतातरी रविवारच्या कैरी बाजारावर प्रशासनाचे नियंत्रण असावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

बाहेरगावच्या कैरी व्यावसायिकांकडे लक्ष 
कैरी बाजारात व्यावसायिकांकडून कोणतेही सामाजिक अंतर किंवा सॅनिटायझर केले जात नाही. किंबहुना अमळनेर, भडगाव, धुळे, जळगाव, गुजरात यासह इतर तालुक्‍यांतील व्यापारी कैरी विक्रीसाठी पारोळ्यात दाखल होतात. यामुळे "कोरोना'चा संसर्ग होण्याची भीती नाकारता येणार नाही. यासाठी प्रशासनाने अशा व्यावसायिकांकडे कडक लक्ष ठेवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

कंटेन्मेंट झोनमध्ये बाजारपेठ बंद 
गेल्या 25 दिवसांपासून मुख्य बाजारपेठ कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने बंद आहे. मात्र, महामार्गालगतच्या बाजारात नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत. त्यामुळे "कोरोना'चा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत असून, आतातरी गाफील न राहता गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.