बालाजी रिक्षा युनियन चालक-मालक संघटना पोटाचा उदरनिर्वाहासाठी शहरात रिक्षा चालवीत आहेत.एसटीचे आंदोलन..प्रवासी अभावी रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीचे आंदोलन..प्रवासी अभावी रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

एसटीचे आंदोलन..प्रवासी अभावी रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ

पारोळा ः गेल्या तीन चार दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Workers Movement) बेमुदत आंदोलनामुळे पारोळा बस स्थानकात (Parola bus stand) शुकशुकाट आहे. स्थानकातील प्रवासी हे लांब पल्ल्याच्या अंतरासाठी रिक्षाचा वापर करून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र गेल्या तीन दिवसापासून स्थानकात एसटी नसल्यामुळे रिक्षाचालकांना प्रवासी मिळत नसल्याने प्रवासी अभावी ताटकळत उभे राहावे लागत असून रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा: धुळे:जिप सदस्य विरेंद्रसिंह गिरासे अपात्र,निविदा मंजूर करणे भोवले

शहर हे महामार्गालगत असल्याने अवजड वाहनांस इतर अनेक वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा या रस्त्यातून होत असते. यामुळे स्थानका समोरील रिक्षाचालकांच्या दिवसातून अनेक रिक्षा फेऱ्या मुळे रोजगार मिळत होता. मात्र गेल्या तीन दिवसापासून एसटीच्या आंदोलनामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे रिक्षा चालक-मालक संघटनेने सकाळशी बोलताना सांगितले.

गेल्या अनेक वर्षापासून बसस्थानकासमोर बालाजी रिक्षा युनियन चालक-मालक संघटना पोटाचा उदरनिर्वाहासाठी शहरात रिक्षा चालवीत आहेत. शहरात इतर कोणतेही रोजगाराची साधने नसल्याने अनेक युवक रिक्षा चालवून आपला चरित्रार्थ भागवित आहे.

बस स्थानकावर एसटीच्या लांब पल्ल्यांच्या फेर्‍या किंवा तालुक्यातील फेऱ्या होत असल्याने प्रवासी धारकांची गर्दी वाढते त्या अनुषंगाने रिक्षाचालकांना रोजगार उपलब्ध होतो .मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून एसटी ची चाके थांबल्याने सर्व व्यवसायांचे दिवाळे निघाले असून एसटी केव्हा पूर्ववत सुरू होईल या आशेने सर्वजण पाहत आहे.

हेही वाचा: अरेच्चा..पोलीस पाटीलांच्या घरीच चोरट्यांची हातसफाई

दरम्यान एसटी बंद असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीत गर्दी होत असल्याने मिळेल त्या वाहनाच्या सहाय्याने प्रवासी प्रवास करीत आहे. रिक्षाचालकांना प्रवासी मिळत नसल्याने त्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.यावेळी बालाजी रिक्षा युनियन चालक-मालक संघटनेचे संजय चौधरी, संजय गुलाब चौधरी, किशोर पाटील, विकी चौधरी, अनिल चौधरी, राजू चौधरी, नरेश बारी ,जितू महाजन, रामकृष्ण पाटील यांनी आपली व्यथा मांडली.

loading image
go to top