कच्ची कैरीचा मोह...इकडून तिकडे नुसतीच भागम्‌ भाग 

parola weakly market
parola weakly market

पारोळा : "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर आठवडे बाजाराला बंदी घातली आहे. असे असताना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून काही विक्रेत्यांनी आज कैरी विकण्यास सुरवात केली. मात्र, प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच विक्रेत्यांसह नागरिकांसह पळापळ झाली. परंतु काहींनी मात्र अन्य भागात बाजार थाटून "चोरी चोरी चुपके चुपके' कैरी विकल्याचे दिसून आले. 
आठवडे बाजाराला बंदी असताना शहरासह बाहेरगावच्या व्यावसायिकांनी कैरी विक्रीसाठी आणली होती. मात्र, प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरू करताच व्यावसायिकांनी कंकराज व भोकरबारी परिसरात कैरीचा बाजार थाटला. यावेळी नागरिकांनी धावपळ करीत मिळेल ती कैरी व वाटेल तो भाव देत खरेदी केली. यावेळी पोलिसांनी व्यावसायिकांनी वजनकाटे देखील जमा केल्याचे दिसून आले. 
 
"फिजिकल डिस्टन्सिंग'चा फज्जा 
आजच्या कैरी बाजारात काहींनी रस्त्यावर, तर काहींनी भितींचा व घराचा आडोसा घेत कैरी विकली. परंतु नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे भान न ठेवता व तोंडाला रुमाल किंवा मास्क न बांधता गर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, अनेकांना धावपळ करुन देखील कैरी न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली. 

वजन काटेही केले जप्त
कैरी खरेदीसाठी नागरिक भोकरबारी, कंकराज परिसरात रविवारच्या आठवडे बाजारास बंदी असतांना देखील शहरासह बाहेरगावच्या व्यावसायिकनी कैरी विक्री केल्याने प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरु करताच व्यावसायिकनी कंकराज व भोकरबारी परिसरात कैरी विकली. यावेळी नागरिकांनी भागम भाग करित मिळेल ती कैरी व वाटेल तो भाव देत खरेदी केली. यावेळी पोलिसांनी व्यावसायिक यांचे वजनकाटे देखील जमा केल्याचे दिसुन आले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com