esakal | कोरोना रुग्णांसाठी धावतोय ‘राजकुमार’ सेवादूत !

बोलून बातमी शोधा

help

कोरोना रुग्णांसाठी धावतोय ‘राजकुमार’ सेवादूत !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारोळा : दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आधी शहरी भागात असलेला कोरोनाचा संसर्ग आता शेवटच्या तांडा, वस्तीपर्यंत पोचला आहे. अशा भयावह परिस्थितीत अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले असले तरी अनेक व्यक्ती गरजवंतांना मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मुंदाणे प्र. उ. येथील राजकुमार पाटील गरजवंतांसाठी सेवादूत म्हणून भूमिका निभावत आहेत.

हेही वाचा: परराज्यातून जळगावात येणाऱ्यांना..१४ दिवस होम क्वॉरंटाइन नियम

ग्रामीण भागात लोक आजार लपवताना दिसत आहेत. त्या मुळे केव्हा कोणती टेस्ट करावी, कोणता उपचार घ्यावा, खूप खर्च येईल, अशा मानसिकतेत लोक आहेत. या लोकांना योग्य सल्ला देऊन जास्तीत जास्त सरकारी रुग्णालयात उपचार करणे किंवा कमी रुपयांमध्ये उपचार कसा होईल, यासाठी संपर्क साधलेल्या रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाइकांना समजविण्याचे, स्वत: त्यांच्या सोबत जाऊन टेस्ट करायला लावणे, गरज असल्यास सरकारी किंवा जास्त त्रास असल्यास खासगी रुग्णालयात दाखल करणे, रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्यास ओळखीच्या डॉक्टरांशी संपर्क साधून ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचे कार्य ते महिनाभरापासून करीत आहेत. राजकुमार पाटील डॉक्टर व रुग्णांतील दूत म्हणून कार्य करीत आहेत.

हेही वाचा: एक लिटर दुधाचा भाव..दोन पाण्याच्या बाटल्यांएवढा !

मी कामानिमित्त सिल्वासा येथे असून, माझ्या आईला खूप त्रास होत असल्याचे राजकुमार पाटील यांना समजले असता, त्यांनी रात्री दहाला खासगी वाहनाने पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. आईची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व टेस्ट करून ॲडमिट केले. माझी आईची प्रकृती उत्तम असून, सुखरूप घरी परतली आहे.

-धनंजय पाटील, मुंदाणे प्र. ऊ.

माझ्या आईला कोरोनाची लागण झाल्याने मी स्वत: रुग्णालयात थांबून होतो. त्या वेळी सर्व परिस्थिती जवळून बघितली. त्यानंतर माझ्याशी संपर्क साधणाऱ्या प्रत्येकाला कमी खर्चात, चांगले उपचार मिळावेत, हा प्रयत्न माझा आहे. गरज नसताना इतर टेस्ट करणे, इंजेक्शनमध्ये सुरू असलेला काळा बाजार यापासून लोकांचा बचाव व्हावा व आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी लोकांना मदत करीत असून, त्याला डॉक्टरांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

-राजकुमार पाटील, मुंदाणे प्र. उ.

संपादन- भूषण श्रीखंडे