esakal | केळी पीक विम्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

केळी पीक विम्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

अमरीश पटेल यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळी पीक विम्याचा तिढा सोडवण्यासाठी आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांची माहिती घेतली.

केळी पीक विम्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर: केळी पीक विम्याचा तिढा सोडवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिकेचा पाठपुरावा केल्याशिवाय मार्ग निघणार नसल्याचा निष्कर्ष शिरपूर ( जि धुळे ) येथे शेतकऱ्यांच्या बैठकीत काढण्यात आला. माजी मंत्री अमरीश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.

वाचा- एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह, उपचारासाठी मुंबईला जाणार


बैठकीत आमदार काशीराम पावरा, शिरपूरचे नगराध्यक्ष भूपेश पटेल, उच्च न्यायालयात केळी पीक विम्याची जनहित याचिका दाखल करणारे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष के डी पाटील तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री दहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव आणि धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा झाली. या बैठकीत राहुल पाटील,रमेश पाटील, अतुल पाटील ( बलवाडी ), जयंत पाटील (तांदळवाडी) वसंत तोंडे, प्रकाश पाटील यांच्यासह केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते. 

अमरीश पटेल यांनी जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळी पीक विम्याचा तिढा सोडवण्यासाठी आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांची माहिती घेतली. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी उच्च न्यायालयात औरंगाबाद येथे जनहित याचिकेचा पाठपुरावा करण्याचा आवश्यक असल्याचे श्री पटेल यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या याचिकेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी शिरपूर येथील आयटी पार्क आणि टेक्स्टाईल पार्कला देखील भेट देऊन पाहणी केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे