esakal | दुर्दैवी घटनाःआईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या मुलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

दुर्दैवी घटनाःआईच्या अंत्यदर्शनासाठी निघालेल्या मुलीचा मृत्यू

sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : आईच्या निधनाचे वृत्त ऐकून अंत्यसंस्काराला (Mother Death) निघालेल्या मुलीचाही मोटारसायकल वरून पडून दुःखद (Accident) अंत झाल्याची घटना सायंकाळी उशिरा भोकरीजवळ घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील खानापूर येथील जनार्दन धांडे यांच्या आई तुळसाबाई बाबुराव धांडे ( वय ९० वर्ष ) यांचे आज सायंकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची मुलगी आशाबाई प्रेमचंद चौधरी (वय ६१ वर्षे) रा मस्कावद यांना हे वृत्त कळले. आईचे अंत्यसंस्कार उद्या (ता२) ला सकाळी १० वाजता होणार असल्याचे सांगून मस्कावद येथील नातेवाईकांनी त्यांना समजावले. पण त्यांची तब्येत बरी नसतानाही त्या आईचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी आपला मुलगा चेतनबरोबर मोटार सायकलवर सायंकाळीच निघाल्या.

हेही वाचा: न्हावी शिवारात प्रौढाचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू

भोकरी गावाजवळून पुढे गेल्यावर हॉटेल राजेश्वरीजवळून जात असताना रस्त्यावर असलेल्या प्रचंड खड्ड्यांमुळे त्या रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या डोक्यास गंभीर इजा होऊन त्या रक्तबंबाळ झाल्या. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले पण त्यांचे निधन झाले.

हेही वाचा: आई-वडीलांच्या भांडणाला मुलगा कंटाळला; आणि थेट धरणात घेतली उडी

धक्का स्टार्ट ऍम्ब्युलन्स

जखमी आशाबाई यांना घेऊन उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आलेली १०८ क्रमांकाची ॲम्बुलन्स देखील नादुरुस्त असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर येथून जाणाऱ्या काही युवकांनी पोलीस ठाण्याला आणि रुग्णालयाला कळवून ॲम्बुलन्सची मागणी केली. ॲम्बुलन्स तेथे आली मात्र आशाबाई यांना ॲम्बुलन्समध्ये ठेवल्यावर ती स्टार्ट होईना. अखेर सर्वांनी धक्का देऊन ॲम्बुलन्स सुरू केली. ही ॲम्बुलन्स तातडीने दुरुस्त करावी किंवा नवी ॲम्बुलन्स आरोग्य विभागाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी युवकांनी केली आहे.

loading image
go to top