esakal | अखेर..दीड वर्षांनंतर महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील बस सेवा पुन्हा सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra-Madhya Pradesh ST bus

अखेर..दीड वर्षांनंतर महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील बस सेवा पुन्हा सुरू

sakal_logo
By
दिलीप वैद्य


रावेर ः तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर आजपासून रावेर-बऱ्हाणपूर एस. टी. बस (Raver-Barhanpur ST bus) सेवा पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली आहे. आज ( ता २) महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सुमारे १० एस टी बस (Maharashtra-Madhya Pradesh ST bus) गाड्यांची प्रवाशांसह ये जा सुरू झाली आहे. आगामी काळात या फेऱ्यांची संख्या वाढेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा: अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही..!


२२ मार्च २०२० पासून रावेर - बऱ्हाणपूर दरम्यानची एस टी बस सेवा बंद झाली होती. मध्यप्रदेशातील कंत्राटी तत्त्वावर असलेल्या खासगी बस गाड्या देखील महाराष्ट्रात येत नव्हत्या.त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले तसेच खाजगी गाड्यांनी बेकायदेशीररित्या प्रवासी वाहतूक करून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट ही या काळात केली.

Raver-Barhanpur ST bus

Raver-Barhanpur ST bus


दरम्यान,आज मध्यप्रदेश प्रशासनाने महाराष्ट्रातील एस टी बस गाड्यांच्या येण्या जाण्यावरील निर्बंध १ सप्टेंबर पासून उठविले. आज सकाळीच मध्य प्रदेशातील खासगी बस गाडी रावेर बस स्थानकात आली आणि त्यानंतर एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून महाराष्ट्रातील एस टी गाड्या देखील बऱ्हाणपूरमध्ये पाठवल्या.आज बस गाड्यांचा पहिला दिवस असूनही या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. येथील आगाराचे वाहतूक निरीक्षक जयंत चोपडे यांनी सकाळला सांगितले की, रावेर- बऱ्हाणपूर दरम्यान आपल्या आगाराच्या ३८ बस फेऱ्या आधी सुरू होत्या, लवकरच या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात येतील. दरम्यान, तब्बल १७ महिन्यात एस टी महामंडळाचे रावेर बऱ्हाणपूर दरम्यानचे रोजचे सव्वा ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.

हेही वाचा: धुळ्यात कचरा प्रश्न पेटला..नागरिक कचरा घेऊन पोहचले आयुक्त दालनात


`सकाळचा` पाठपुरावा
रावेर-बऱ्हाणपूर दरम्यानची बस सेवा बंद असल्याबद्दल दैनिक सकाळने १२ ऑगस्ट आणि २७ ऑगस्टला सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल मध्य प्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस यांनीही घेतली तसेच येथील एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांनी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश पाटील यांनी बऱ्हाणपूर येथे जाऊन या बसगाड्या पुन्हा सुरू करण्याची विनंती तेथील प्रशासनाला केली होती. यांचा परिणाम म्हणूनच आजपासून निर्बंधात वाढ न करता या बसगाड्या पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.

loading image
go to top