esakal | अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही..!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Murti made

अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही..!

sakal_logo
By
चंद्रकांत चौधरीपाचोरा : येथील मूर्तिकार घोडके परिवार दोन वर्षांपासून पारंपरिक मूर्ती बनविण्याच्या (Ganesh Murti made) व्यवसायापासून (Business) प्रचंड व्यथित झाला असून, मूर्तिकार म्हणून तिसरी पिढी कार्य करीत असताना, अशी वेळ आतापर्यंत अनुभवली नाही, व्यवसाय चालवावा तरी कसा, अशी व्यथा घोडके परिवाराने व्यक्त केली.

हेही वाचा: ‘त्या’ महसूल मंडळांना आगाऊ २५ टक्के रक्कम


रंगार गल्लीमधील घोडके परिवाराने १९४५ पासून गणपती बनविण्याचा व्यवसाय सुरू केला. (कै.) नारायण घोडके त्यानंतर (कै.) प्रकाश घोडके व राजूशेठ घोडके यांनी हा व्यवसाय सांभाळला. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांत मागणी वाढल्याने व्यवसाय वाढू लागला. जागा कमी पडू लागल्याने देशमुखवाडीत जागा घेऊन व्यवसाय वाढवला. गणपतीसोबत देवी मूर्तीही बनवण्यास सुरवात केली. मागणी जास्त वाढत गेल्यामुळे संपूर्ण परिवाराने दुसरा कुठलाही व्यवसाय न करता सर्वजण या व्यवसायात गुंतले.

हेही वाचा: गाय, म्हशीच्या दूध खरेदीदरात वाढ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निर्णय

घोडके परिवाराची तिसरी पिढी व्यवसायात

सध्या घोडके परिवाराची तिसरी पिढी या व्यवसायात सक्रिय आहे. राजू घोडके, शैला घोडके, प्रमिला घोडके, वैभव घोडके, प्रिया घोडके, गौरव घोडके या तिसऱ्या पिढीतील मूर्तिकारांनी सारोळा रोडवर जागा घेऊन व्यवसाय सुरू ठेवला आहे. घोडके परिवार अहोरात्र मेहनत करून आकर्षक लहान- मोठ्या मूर्ती घडवतात. सारा परिवार वर्षभर यातच गुंतलेला असतो व त्यावरच संपूर्ण परिवाराचा उदरनिर्वाह चालतो.

हेही वाचा: चाळीसगावच्या पूरग्रस्तांना पहिली मदत खाकीची..!

कोरोनामूळे व्यवसाय अडचणीत

असे असताना गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे व शासनातर्फे लावण्यात येणाऱ्या विविधांगी निर्बंधांमुळे हा परिवार प्रचंड व्यथित झाला असून, मोठ्या परिश्रमाने बनविलेल्या मूर्ती विक्री होण्यात अडचणी येत असल्याने व्यवसायात गुंतवलेले भांडवल धोक्यात आले आहे व उदरनिर्वाह चालवणे जिकरीचे झाले आहे. शासनाने या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून मूर्तिकारांना मदत व सहकार्य करून हा व्यवसाय अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

loading image
go to top