सतत गैरहजर राहिल्याने रावेर समाजकल्याण विभागातील लिपीक निलंबीत

दिलीप वैद्य
Tuesday, 26 January 2021

सेवेत नेहमी कर्तव्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी होत्या. विना परवानगीने सतत गैरहजर राहणे आदी कामांवरून निलंबीत झाले.

रावेर ः येथील पंचायत समितीच्या समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ लिपिक सलीम तडवी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत.

आवश्य वाचा- राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13 हजार 668 कोटींचा आराखडा तयार !

याबाबत वृत्त असे की, रावेर पंचायत समिती कार्यालयात समाजकल्याण वरिष्ठ लिपिक म्हणून सेवारत असलेले सलीम तडवी हे सेवेत नेहमी कर्तव्यात कसूर करत असल्याच्या तक्रारी होत्या. विना परवानगीने सतत गैरहजर राहणे, समाजकल्याण
योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देतांना कर्तव्यात नेहमी कसूर करत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.
पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. यामुळे
पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे जळगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver panchyat panchayat samiti clerk suspended