रावेर तालुक्यात चक्रीवादळाने १८ कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

सर्वाधिक नुकसान निंभोरा बुद्रुक येथील ४३५ शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्रातील ८ कोटी ४० लाख तर त्या खालोखाल रावेर येथील ११० शेतकऱ्यांचे २२ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे २ कोटी ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

रावेर : तालुक्यात काल (ता. १०) दुपारी व रात्री झालेल्या चक्रीवादळी पावसामुळे २७ गावातील ८७७ शेतकऱ्यांच्या साडे चारशे हेक्टर क्षेत्रातील केळी पिके जमीनदोस्त झाली. सुमारे १८ कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे. 
तालुक्यात सर्वाधिक नुकसान निंभोरा बुद्रुक येथील ४३५ शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्रातील ८ कोटी ४० लाख तर त्या खालोखाल रावेर येथील ११० शेतकऱ्यांचे २२ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकांचे २ कोटी ८८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील निंभोरा बुद्रुक चिनावल वडगाव विवरे खुर्दकुंभारखेडा या भागांत चक्रीवादळामुळेकेळीचे मोठे नुकसान झालेत्यानंतर सहा तासातच रात्री साडेनऊच्या सुमारास पूर्व भारताकडून पश्चिमेकडील भागात यात सुमारे अर्धा तास चक्री वादळी पावसाने थैमान घातले . यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. आज महसुल व कृषी विभागाने केळी पिक नुकसानिचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल. 

असे आहे नुकसान 
निंभोरा बुद्रुक- ४३५ शेतकरी- २१० हेक्टर क्षेत्र- नुकसान ८ कोटी ४० लाख, 
रावेर - ११० शेतकरी - ७२ हेक्टर क्षेत्र - नुकसान २ कोटी ८८ लाख, 
विवरे खू- ७५ शेतकरी - ४० हेक्टर क्षेत्र - नुकसान १ कोटी ६० लाख 
वडगाव - ७५ शेतकरी - ४० हेक्टर क्षेत्र - नुकसान १ कोटी ६० लाख , 
अटवाडे - २२ शेतकरी - १५ हेक्टर क्षेत्र - नुकसान ६० लाख, 
बोरखेडा - १३ शेतकरी ८ हेक्टर क्षेत्र - नुकसान ३२ लाख, 
तामसवाडी- २० शेतकरी- १० हेक्टर क्षेत्र - नुकसान ४० लाख, 
भोकरी- १५ शेतकरी - ८ हेक्टर क्षेत्र - नुकसान ३२ लाख, 
मोरगाव खु. - ७ शेतकरी - ३ हेक्टर क्षेत्र - नुकसान १२ लाख, 
मोरगाव बू - ५ शेतकरी .- २ हेक्टर क्षेत्र - नुकसान ८ लाख, 
केऱ्हाळे बु - १४ शेतकरी- ७.६० हेक्टर क्षेत्र - नुकसान ३० लाख ४० हजार, 
केऱ्हाळे खू - ९ शेतकरी- ५ हेक्टर क्षेत्र- नुकसान २० लाख, 
वाघोड - ६ शेतकरी - ४ हेक्टर क्षेत्र - नुकसान १६ लाख, 
कर्जोद - ३ शेतकरी - १.९० हेक्टर क्षेत्र - नुकसान ७ लाख ८ हजार, 
विवरे बू - २ शेतकरी- २ हेक्टर क्षेत्र - नुकसान ८ लाख 
भाटखेडा- ४ शेतकरी- १.५० हेक्टर क्षेत्र - नुकसान ६ लाख , 
होळ - २ शेतकरी - २ हेक्टर क्षेत्र - नुकसान ८ लाख, 
भोर - ९ शेतकरी - ३ हेक्टर क्षेत्र - नुकसान १२ लाख, 
ऐनपूर - ४ शेतकरी - ३ हेक्टर क्षेत्र - नुकसान १२ लाख, 
निंबोल - ४ शेतकरी - २ हेक्टर क्षेत्र - नुकसान ८ लाख, 
धूरखेडा - २ शेतकरी - ०.१५ हेक्टर क्षेत्र - नुकसान ६० हजार, 
बोहरडे- २ शेतकरी- ०.२५ हेक्टर क्षेत्र- नुकसान १ लाख, 
पातोंडी - ३ शेतकरी -१.७५ हेक्टर क्षेत्र - नुकसान ७ लाख, 
पुनखेडा - ४ शेतकरी - २.५० हेक्टर क्षेत्र - नुकसान १० लाख, 
कुंभारखेडा - १५ शेतकरी - ३ हेक्टर क्षेत्र - नुकसान १२ लाख, 
चिनावल - १४ शेतकरी - ३ हेक्टर क्षेत्र - नुकसान १२ लाख, 
चुनवाडे - ३ शेतकरी - ०.२० हेक्टर क्षेत्र - नुकसान ८० हजार, असे रावेर तालुक्यातील ८७७ शेतकऱ्यांच्या ४५०.८५ हेक्टर क्षेत्रातील केळी पीकांचे सुमारे १८ कोटी ३ लाख ४० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे . 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver taluka banana production 18 carrore loss Hurricane