esakal | गारपिटीने सव्वातीनशे एकर क्षेत्रातील केळीचे नुकसान !

बोलून बातमी शोधा

गारपिटीने सव्वातीनशे एकर क्षेत्रातील केळीचे नुकसान !
गारपिटीने सव्वातीनशे एकर क्षेत्रातील केळीचे नुकसान !
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

रावेर : तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेला वादळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यामुळे तालुक्यातील १४ गावांतील ४०८ शेतकऱ्यांच्या सुमारे सव्वातीनशे एकर क्षेत्रातील केळी पिकाचे १२ कोटी ९१ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल गुरुवारी कृषी व महसूल विभागाने सादर केला.

हेही वाचा: पती-पत्नीचा गळा आवळून खून; दागिने पळवून केला दरोड्याचा बनाव

तालुक्यातील सातपुडा पर्वत भागातील शिवारात बुधवारी (ता. २१) सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस व गारा पडल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले केळी पीक व भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने गुरुवारी तालुक्यातील नुकसान झालेल्या १४ गावांतील नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला. दरम्यान, वस्तुनिष्ठ पंचनाम्यास शुक्रवार पासून सुरवात होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले

हेही वाचा: कोरोना काळात..जळगाव शहरात दरमहा १०० ने वाढ

गावनिहाय शेतकरीसंख्या व कंसात बाधित क्षेत्र असे : यात पिंप्री ७६ (५५), जुनोने ५६ (४२), मोहगण ३५ (२७), अभोडा बुद्रुक ५२ (४६), जिन्सी १० (१२), अभोडा खुर्द १३ (१०), रसलपूर ३५ (४०), खिरोदा प्र. रावेर ५२ (४२), केऱ्हाळे बुद्रुक ६ (०४), केऱ्हाळे खुर्द ५ (३), पाडळे बुद्रुक १३ (१०), पाडळे खुर्द १३ (८), मंगरूळ ३५ (२८), अहिरवाडी २ (०.८०)

संपादन- भूषण श्रीखंडे