पती-पत्नीचा गळा आवळून खून; दागिने पळवून केला दरोड्याचा बनाव

आई-बाबांचा फोन लागतच नाही म्हणून मुलींनी आजी व मावशास बघायला पाठविल्यावर हा भयंकर प्रकार उघडकीस आला
crime
crimecrime

जळगाव : ओमसाईनगर कुसुंबा येथील दांपत्याचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी घडली. आई-बाबांचा फोन लागतच नाही म्हणून मुलींनी आजी व मावशास बघायला पाठविल्यावर हा भयंकर प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत मृताच्या घरापर्यंत कोणीच गेले नाही. मुरलीधर राजाराम पाटील (वय ५४) व आशाबाई पाटील (४७) असे खून झालेल्या दांपत्याने नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी मृत दांपत्याच्या जवळच्या एका इस्टेट ब्रोकर मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

crime
कोरोना काळात..जळगाव शहरात दरमहा १०० ने वाढ

जळगाव-औरंगाबाद रोडवर कुसुंबा खुर्द येथे ओमसाईनगर आहे. गेल्या वर्षी (२०२०) प्लॉट घेऊन दोनमजली टुमदार घर बांधून आशाबाई, मुरलीधर पाटील हे दांपत्य राहण्यास आले. त्यांना शीतल व स्वाती अशा दोन मुली असून, दोघींचे विवाह झाल्याने त्या सासरी असतात. बुधवारी रात्री नऊला मुलगी शीतलने आईला फोन केला. मात्र, फोन बंद होता. वडिलांचाही लागत नाही म्हणून सकाळपर्यंत वाट बघितली. संपर्कच होत नसल्याने जवळच सुप्रीम कॉलनीतील मावशीला कळविले. आजी व मावसा संतोष पाटील हे दोघेही दुपारी अडीचला त्यांच्या घरी आले. समोरील दार बंद असल्याने मागे स्वयंपाकघराच्या दाराने आत जाऊन बघितले असता आशाबाईचा मृतदेह आढळून आला. घरात शोधाशोध केल्यावर गच्चीवर मुरलीधर पाटील यांचा मृतदेह दिसला. नायलॉन दोरी किंवा वायरने गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, निरीक्षक किरणकुमार बकाले, निरीक्षक प्रताप शिकारे यांच्यासह विविध पथके घटनास्थळी आली.

मृत आशाबाई बोलायला फटकळ आणि स्वभावाने कडक होत्या. त्यांच्याकडे भिशी चालविली जायची. ५० हजारांपासून १० लाखांपर्यंत भिशीचे व्यवहार होते. सहसा त्यांच्या घरी मुली, जावई यांच्याव्यतिरिक्त कुणीही नातेवाईक येत नसत. काल रात्री मुरलीधर पाटील यांचे साडू संतोष पाटील गॅसशेगडी घेण्यासाठी आले होते, अशी माहिती आप्तस्वकीयांकडून पोलिसांना मिळाली.

crime
जळगावात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी पकडली

दरोड्याचा बनाव
मृत आशाबाईच्या अंगावरील दागिने, कपाटातील रोकड आणि २० तोळ्यांचे दागिने मारेकऱ्यांनी चोरून नेले. सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दरोड्याचा बनाव केल्याचा संशय आहे. घराचे मुख्यद्वार बंद होते. घटनेनंतर मारेकरी किचनच्या दारातून पसार झाले, खुनासाठी शस्त्राचा वापर नसल्याने परिचितांनीच खून केल्याचा संशय आहे.

crime
पारोळा बाजार समिती उभारणार शंभर बेडचे कोविड रुग्णालय

संशयितांची चौकशी
दुपारी रिक्षाचालकाशी भांडण झाले होते. साधारण वर्षभरापूर्वी धीरज हरजिंग वाघ याने मारझोड केली होती. मृत पाटील दांपत्याच्या दोन्ही मुली त्यांच्या घरी राहतात. कुणीही न येणाऱ्या या कुटुंबाकडे दिलीप कांबळे (रा. महाबळ) या इस्टेट ब्रोकरचा घरोबा असल्याने त्याची इन्होवा कारदेखील तेथेच पडून असते. रोजच सकाळ-सायंकाळ घरी येणारा दिलीप खुनाच्या घटनेनंतर सायंकाळपर्यंत फिरकला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने त्याला दारूच्या नशेत तर्र असताना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com