महाराष्ट्र हादरला जळगावमध्ये चार चिमुकल्यांची कुऱ्हाडीचा घाव घालून हत्या !

दिलीप वैद्य
Friday, 16 October 2020

रावेर शहरात चौघा भावडांची आज निघृन हत्या झाल्याने रावेर शहरास संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पोलिस यंत्रणा देखील मारेकाऱयांचा शोध घेण्यासाठी कामाला लागली आहे.

रावेर : शहरा जवळ असलेल्या बोरखेडा रस्त्यावर असलेल्या शेतातील एका सालदाराच्या घरात चार लहान अल्पवयीन मुलांचा निघृन हत्या झाल्याची घटना घडली. त्यामुळे रावेर परिसरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. चौघांचा कुऱ्हाडीने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी, श्वान पथक पोहचले आहे. तसेच पोलिस अधिक्षक देखील घटनास्थळी रवाना झाले आहे.   

वाचा- चाचण्या निम्म्यावर कारण, रुग्णसंख्या घटली

रावेर शहरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरखेडा रस्त्यावरील शेख मुस्‍तुफा यांच्या शेतात सालदार म्हणून राहणाऱ्या महताब आणि रुमली बाई भिलाला हे दांपत्य आपल्या मूळ गावी मध्यप्रदेशातील गढी ( जि खरगोन ) येथे गेले असता घरात चारही मुले एकटी होती. त्यातील सईता ( वय १२ वर्ष)  रावल ( वय ११ वर्ष ) अनिल ( वय ८ वर्ष) आणि सुमन  वय ३ वर्ष ) या चौघांचा खून झाल्याचे शेत मालकाला सकाळी आढळून आले आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव

याबाबत विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार यांच्यासह पोलीसांचा ताफा दाखल झाला आहे. 

भादली हत्याकांडाची आठवण

पाच वर्षापुर्वी जळगाव शहरा जवळील भादली गावात एकाच कुटूबांतील चार जणांची हत्या घडली होती. अद्यापर्यंत या घटनेचा उलगडा करण्यास पोलिसांना अपयश आले आहे. त्यात आज देखील याच प्रकारे झालेल्या हत्याकांडामूळे भादली हत्याकांडाची पुनारवृत्ती झाली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हाण गुन्हाचा छडा लावण्याचे आवाहन असणार आहे.

आवश्य वाचा- सातबारा उताऱ्यांवरील चुकांचा‘सिलसिला’थांबेना !
 

पोलिस अधीक्षक व श्वान पथक रवाना

गंभीर घटना असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे तसेच श्वान पथक, फिंगर प्रिंट पथक हे घनास्थळी रवाना झाले आहे. तर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे घटनास्थळी उपस्थित आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news raver unknown takes live our children of a farm saldar in Raver