esakal | कीर्तनकारांना सरकारकडून मिळणार पाच हजार मानधन
sakal

बोलून बातमी शोधा

 Rohini Khadse-Khewalkar

कीर्तनकारांना सरकारकडून मिळणार पाच हजार मानधन

sakal_logo
By
प्रविण पाटील


सावदा : कोरोना (Corona) काळात भजन, कीर्तन बंद (Kirtankar)असल्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा जवळपास ४८ हजार कलावंतांच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले होते. त्यामुळे कीर्तनकार, टाळकरी यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर (District Bank President Rohini Khadse-Khewalkar) यांनी ६ मेला राज्य सरकारकडे केली होती.

हेही वाचा: बाप्पाचे जल्लोषात स्वागत..सलग दुसऱ्यावर्षी ढोल-ताशांचा गजर नाही

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले होते. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इ-मेलद्वारे निवेदन पाठविले होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, या कलावंतांना महिन्याला ५ हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.
कोरोना काळात राज्यातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे कीर्तनकार मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. वारकरी संप्रदायाची दुरवस्था झाल्याचे जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करत सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

हेही वाचा: बोरी नदी पात्रात केमिकल मिश्रीत पाणी..गावकरी झाले अचंबित

आता श्रावण महिना संपला आहे आणि सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण काही दिवसांवर आले आहेत. अशा वेळेस गर्दी होण्याची दाट शक्यता असते, पण गर्दी होऊ नये म्हणून शासन आता जमावबंदीसारखे निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने पुढील काही दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक यांना आर्थिक मदत देण्याचा शासनाचा निर्णय निश्चितच दिलासादायक असल्याचे रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सांगितले.

loading image
go to top