दहा हजारांची लाच स्वीकारतांना उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबल जाळ्यात

वरणगाव पोलिस ठाण्यात सापळा रचून दोघांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली
acb tryap
acb tryapacb tryap



वरणगाव : वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळू (sand) वाहतूक व व्यवसाय करण्यासाठी डंपर मालंकांकडून महिन्याला १० हजार रूपयांची मागणी वरगणगाव पोलीस स्टेशनचे (Varganaon Police Station) पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलने केली होती. त्यानुसार आज दुपारी एकला ठरल्या प्रमाणे १० हजार रूपयांची लाच स्वीकारतांना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने रंगेहाथ अटक केली. आहे.(sub-inspector and constable caught accepting bribe acb squad action)

acb tryap
जिल्हाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पुलाचे काम पूर्ण करण्याचा दिला 'अल्टिमेंटम'

वरणगावसह परीसरात वैध,अवैध रात्रंदिवस वाळूसह अन्य गौण खनिजाची वाहतूक मोठया प्रमाणावर सुरू आहे. त्या दृष्टीने महसुल विभाग सुध्दा कार्यदक्ष आहे. वरणगाव पोलिसांनी सुध्दा बरेच वेळा कारवाया झाल्या आहेत. त्याच प्रमाणे तक्रारदार पुरुष वय ३० (रा.साकेगाव. ता. भुसावळ) यांचा वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय वरणगाव पोलिस ठाणे हद्यीत असल्याने संशयीत आरोपी पोलिस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (वय ५६रा. भिरूड कॉलनी, जळगाव रोड भुसावळ) याला तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर क्रं.एम.एच. ४० एन ४०८६ हे असुन सदर डंपर वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करतांना त्या वाहनावर करवाई न करण्याच्या मोबदल्यात प्रती महिना १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार पो.कॉ. गणेश महादेव शेळके वय-३१, रा.पोलीस वसाहत,वरणगाव ता.भुसावळ, जि.जळगाव यांनी १० हजारांची लाच स्वीकारली. या दोघांना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतिश भामरे यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात सापळा रचून दोघांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली.आहे

acb tryap
अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांचा एल्गार !


यांनी केली कारवाई

पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोनी लोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ,पोकाॅ.महेश सोमवंशी आदींनी हि कारवाई केली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com