गहू पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगभग, आधुनिक पद्धतीने गव्हाची पेरणीवर भर !

भूषण श्रीखंडे
Saturday, 14 November 2020

कापुस लागवड क्षेत्र घट येण्याची शक्यता आहे गव्हाच्या पिकांचे उत्पादान हे बहुतांशी पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर अवलंबून असतो गहु पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस इतके तापमानाची आवश्यकता असते.

यावल : चुंचाळे सह परिसरात गहू व हरभरा पेरणीचे काम संध्या जोमात सुरु आहे गहू हरभरा पेरणीसठी बागायती कपाशी शेतातुन काढण्याचे कामे चालु आहे बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा हा असतो मात्र बागायती कपाशिला थोड्या प्रमाणात कापुस असल्याने दरवर्षी गहु हरभरा लागवड उशीरा होत आसला तरी यावर्षी गहू पेरणीची लगभग शेतकऱ्यांची चालू असतांना दिसून येत आहे.

आवश्य वाचा- वन विभागाला पक्षी सप्ताहाचा पडला विसर, अन्यथा दुर्मीळ प्रजातींची झाली असती नोंद !

यंदाच्या वर्षी बागायती कापुस मोठ्या प्रमाणावर लागवड आहे परंतु कापसाच्या बोडात बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने कपाशी न ठेवण्याचा विचार करीत कपाशी पिक उपटून शेती तयार करतांना दिसत आहे त्या ठिकाणी गहू, हरभरा तर काही शेतकरी उन्हाळी ज्वारी व कलिगंड लागवडीच्या तयारीत दिसत आहे यंदा पाऊस समाधान कारक पडल्याने विहीरीच्या पाणी पातळीत बऱ्या पैकी वाढ झाल्याने येणाऱ्या काळात कापुस पिक पेरा कमी होण्याची चिन्हे दिसत आहे.

 

एंकदरीतच कापुस लागवड क्षेत्र घट येण्याची शक्यता आहे गव्हाच्या पिकांचे उत्पादान हे बहुतांशी पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर अवलंबून असतो गहु पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस इतके तापमानाची आवश्यकता असते दाणे भरण्याच्या वेळी 25अंश सेल्सिअस तापमाण असल्यास गव्हाच्या दाण्याची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते तसेच या वर्षीही गहु व हरभरा पिक पेरा वाढणार आहे कारण चुंचाळे सह परिसरात थंडीचा पारा वाढला आहे दिवाळी सण हा जवळच असल्याने शेतकरी शेतीचे कामे उरकवण्याच्या तयारीने धावपळ करतांना दिसत आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news yawal about farmers for wheat sowing wheat in a modern way