esakal | यावलःदहा रुपयांचे आमीष दाखवून साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

यावलःदहा रुपयांचे आमीष दाखवून साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यावल: दहा रुपयांचे आमीष दाखवत एका साडेतीन वर्षीय चिमुकलीवर पंचवीस वर्षीय नराधमाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करून माणुसकीला काळीमा फासणारी आणि धक्कादायक घटना तालुक्यातील दहिगाव येथे आज घडली. ऐन नवरात्रौत्सवाच्या काळात या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला असून संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचा दिवाळीनंतर धमाका


यावल तालुक्यातील दहिगाव येथे एक कुटुंब हात मजुरी करून उदरनिर्वाह करते. सदर कुटुंबातील महिला ही शुक्रवारी (ता.८) शेतकामास गेली होती. घरी त्यांची एक साडेतीन वर्षाची मुलगी आणि एक बालक होते. शेतमजुरी करून ज्या वेळेस ती महिला घरी परत आली, तेव्हा तिची साडेतीन वर्षीय मुलगी घरात दिसली नाही. तेव्हा आपल्या मुलांस तिने विचारले असता त्याने सांगितले, की शेजारील कैलास प्रल्हाद पाटील (वय २५) हे आपल्या दीदीला घेऊन गेले आहेत. तेव्हा या महिलेने कैलास पाटील यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्यांची साडेतीन वर्षे बालिका अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना आढळून आली. त्या बालिकेला त्यानी सोबत घेतले आणि घरी आणले. व तिची विचारपूस केली असता घटना मुलीने सांगितले.

हेही वाचा: जळगाव शहरात कोरोना नियंत्रणात..तरी कोविड सेंटर ताब्यात

सदर महिला ही भयभीत झाली व तिने ही घटना आपल्या पतीला सांगितली. आणि संशयीत कैलास पाटील यांच्या घरी गेली असता घरातून पळून गेला. तेव्हा पीडित बालिकेने पोलीस ठाणे गाठत संशयीत कैलास पाटील याच्या विरुध्द फिर्याद दिली. पीडीताची वैद्यकीय तपासणी केली असून पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

loading image
go to top