esakal | जळगाव शहरात कोरोना नियंत्रणात..तरी कोविड सेंटर ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Center

जळगाव शहरात कोरोना नियंत्रणात..तरी कोविड सेंटर ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


जळगाव : जूनपासून कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) नियंत्रणात येऊ लागली. ऑक्टोबरपर्यंत ही लाट बऱ्यापैकी ओसरलेली असतानाही तिसऱ्या लाटेसाठी (Corona 3rd Wave) सज्जता म्हणून महापालिकेने (Jalgaon Municipal Corporation) कोविड चाचणी केंद्र व कोविड केअर सेंटर (Covid Center) अद्याप ताब्यातच ठेवले आहे. दुसरीकडे मनपाच्या चार केंद्रांवर चाचण्या सुरू असून, दररोज चार- पाचशे चाचण्या केल्या जात आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्हा बँक निवडणूक:सुडाच्या कारवाईमुळे आता भाजप वगळून पॅनल


राज्यात व जिल्ह्यातही फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर पुन्हा पहिल्या लाटेप्रमाणे कोविड केअर सेंटर, हॉस्पिटलची यंत्रणा सज्ज करण्यात आली. मे- जूनपासून कोरोनाची लाट ओसरू लागली. जुलै, ऑगस्टनंतर दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊ लागली. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापर्यंत संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे.चाचण्याही घटल्या
गेल्या दोन महिन्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्या दहाच्या आत आणि आता तर अगदी एक-दोनच रुग्ण समोर येत आहेत. मात्र, सोबतच जिल्ह्यातील चाचण्यांची संख्याही स्वाभाविकत: कमी झाली आहे. मे, जून महिन्यांत दिवसाला पाच- सात हजारांवर चाचण्या होत होत्या. आता मात्र दररोज हजारही चाचण्या होत नाही. एखाद्या दिवशी हजार, पंधराशेचा आकडा गाठला जातो. तरीही रुग्ण आढळून येण्याचा दर एक टक्क्याच्या खालीच आहे.


शहरात चार- पाचशे चाचण्या
जळगाव शहर कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट बनले होते. त्यामुळे शहरात आजही कोरोनासंबंधी काळजी घेतली जात आहे. महापालिका इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ, रेल्वेस्थानक, शासकीय तंत्रनिकेतन आदी चार ठिकाणी चाचण्या केल्या जात आहेत. विशेषत: प्रवास करणारे, गुन्ह्यातील आरोपी, ज्यांना शिक्षा झाली ते गुन्हेगार आणि डॉक्टरांनी रेफर केलेले रुग्ण अशा लोकांच्या चाचण्या होत आहेत. दररोज चार-पाचशेच्या संख्येत चाचण्या आजही सुरू आहेत.

हेही वाचा: नंदुरबारःआयान साखर कारखान्याची तिसऱ्या दिवशी चौकशी सुरूच


कोविड सेंटर ताब्यातच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील वसतिगृहाच्या इमारती ताब्यात घेतल्या होत्या. तंत्रनिकेतनात चाचणी केंद्र सुरू असून, कोविड सेंटरसाठी ताब्यात इमारतीही तशाच सज्ज आहेत. त्याठिकाणी एकही रुग्ण नाही. तर सिंधी कॉलनी मार्गावरील वसतिगृहही ताब्यात आहेत. तिसरी लाट आलीच तर त्याचा उपयोग होऊ शकेल, त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे.

loading image
go to top