esakal | आमच्याकडे काही जादूची कांडी नाही ! डॉक्टरांचे भावनिक आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

doctor

आमच्याकडे काही जादूची कांडी नाही ! डॉक्टरांचे भावनिक आवाहन

sakal_logo
By
आनंन शिंपीचाळीसगाव : ‘आमच्यासाठी सर्व रुग्ण हे मायबाप, बहीण, भाऊ आहेत. तुम्ही घरी आजार अंगावर काढायचा आणि नंतर आमच्यामागे ससेमिरा लावायचा. आमच्याकडे काही जादूची कांडी नाही. आपणास इतकी काळजी आहे रुग्णांची तर आमच्या सोबत काम करा. कृपया डॉक्टरांना (doctor) त्यांचे काम करू द्या’, असे आर्त आवाहन (Appeal) शहरातील एका डॉक्टरांनी इतर डॉक्टरांच्यावतीने केले आहे.

(corona patients doctors make emotional appeal relatives )

हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

  • सध्या कोरोनाची (corona) लागण होणाऱ्या रुग्णांची (Patients) संख्या कमालीची वाढत आहे. शहरातील जवळपास सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण वाढत असल्याने दवाखाने फुल्ल झाले आहेत. कोरोनासह इतर आजारांचेही रुग्ण दाखल आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांसह रुग्णालयांमधील कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांवर आपल्या परीने उपचार करीत आहेत. सध्या कोरोनामुळे बहुतांश दवाखान्यांमध्ये (hospital) विशेषतः ‘आयसीयू’ युनिट असेल तर त्यात संसर्ग टाळण्यासाठी रुग्णाला भेटण्यासाठी कोणालाही येऊ दिले जात नाही. त्यामुळे बाहेर असलेले नातेवाईक डॉक्टरांना फोनवरून वारंवार आपल्या रुग्णाच्या तब्येतीविषयी विचारणा करतात. काही जण तर नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डॉक्टरांना सातत्याने फोनवरून रुग्णाच्या उपचाराबद्दल बोलत असतात.

हेही वाचा: शेतीवरून वाद विकोपाला; एकाचा मृत्यू..नातेवाइकांचा रास्ता रोको

आणि भावनिक पोस्ट..

या प्रकारामुळे शहरातील एक खासगी डॉक्टरांनी त्रस्त होऊन व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे, की ‘सगळ्यांना हात जोडून विनंती, की डॉक्टर लोकांना काम करू द्या. हा कसा आहे आणि तो कसा आहे, यात आमचा वेळ वाया घालवू नका. आमच्यासाठी सगळे रुग्ण मायबाप, बहीण, भाऊ आहेत. तुम्ही घरी आजार अंगावर काढायचा आणि नंतर आमच्या मागे ससेमिरा लावायचा, आमच्याकडे काही जादूची कांडी नाही. त्यामुळे मी आजपासून फोन बंद करीत आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व. आपणास इतकी काळजी आहे रुग्णांची तर आमच्या सोबत काम करा ही विनंती, कृपया आमची मनःस्थिती समजून घ्यावी’ अशा आशयाची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

हेही वाचा: गिरीश महाजनांनी उपलब्ध करून दिले दोन ऑक्सिजन टँकर

भावना समजून घ्या..

दरम्यान, रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी देवासमान असतात, तेव्हा त्यांना आपल्या रुग्णाच्या तब्येतीविषयी विचारणे काही चुकीचे नाही. त्यामुळे डॉक्टरांनी देखील रुग्णांच्या नातेवाइकांच्या भावना समजून घ्याव्यात, अशी प्रतिक्रिया एका रुग्णाच्या नातलगाने बोलताना व्यक्त केली.

(corona patients doctors make emotional appeal relatives )