दाम्‍पत्‍याचा मोटारसायकलवरील प्रवास ठरला अखेरचा

highway accident
highway accident

यावल : तालुक्यातील किनगावजवळ मोटरसायकल व आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात आसलगाव (ता.जळगाव जामोद, जि. बुलढाणा) येथील मोटरसायकल वरील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. 

अहमदाबाद येथुन आयशर ट्रक (क्र. जीजे.२७ व्ही. ५८३८) ही चोपड्याकडुन भुसावळकडे सामान भरण्यासाठी जात होती. या दरम्‍यान आसलगाव येथील दाम्पत्य यावलकडुन चोपडा शहराकडे मोटर सायकलने (क्र. एम.एच. ३० एजे १८८४) जात असताना दोघांमध्ये समोरासमोर धडक झाली. यात मोटरसायकलवरील दाम्पत्य रस्त्याच्या बाजुला फेकले जावुन जागीच ठार झाले. किनगाव येथील ग्रा.प. सदस्य बबलु कोळी, चिंचोली येथिल गोलु साठे, विजय पाटील, संजय सोंळुखे, किनगाव सचिन न्हायदे, चिंचोली पोपा. राकेश साठे  यांनी तत्काळ भेट देवुन मयताच्या ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले. 

गाडीच्‍या डिक्‍कीतील कागदपत्रांवरून ओळख
मयताच्या खिशात काहीही आढळुन आले नाही. मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये गाडीची कागदपत्रे आढळून आली. यावरून पुनमसिंग रतनसिंग राजपुत असे पाहुन मयत दाम्पत्य हे आसलगाव जळगाव जामोद येथील असल्याचे समजते. दोघं मयत ५० ते ५५ वयोगटातील असल्याचे अंदाज आहे. येथील पो स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवुन दोघं मयताना शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णलयात आणले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com