esakal | सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले- खासदार रक्षा खडसे
sakal

बोलून बातमी शोधा

सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले- खासदार रक्षा खडसे

भारतीय जनता पक्षाचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो, हे भारतीय जनता पक्षातच शक्य होते.

सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले- खासदार रक्षा खडसे

sakal_logo
By
राजू कवडीवाले

यावल : पक्षाने मला दोन वेळा भाजपच्या कमळ चिन्हावर खासदार बनवले आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले आहे. त्यामुळे मी भाजपातच राहणार आहे. भाजपचा विस्तार हा अधिक जोमाने करा, त्यासाठी वेळप्रसंगी नवीन कार्यकर्तेसुद्धा जोडावे लागणार आहे. ते आपण जोडू, असे खासदार रक्षा खडसे यांनी येथे गुरुवारी बैठकीत स्पष्ट केले. 

आवश्य वाचा- सत्ताकेंद्र स्वत:कडे राखण्यात गुलाबरावांची कसोटी !
 

भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक धनश्री चित्रमंदिराच्या हॉलमध्ये घेण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकात सांगितले, की भाजपची संघटना मजबूत आहे. ती अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने व एकदिलाने काम करावे. डॉ. राजेंद्र फडके म्हणाले, की जनसंघापासून भाजपचे काम चालू आहे. (स्व.) उत्तम नाना पाटील, (कै.) डॉ. अशोक फडके, चोपड्याचे माजी आमदार माधवराव पाटील असे अनेक पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार-खासदार अशा विपरीत परिस्थितीमध्ये निवडून आलेले आहेत. 

लहान कार्यकर्त्ता देखील मोठा होवू शकतो- पुराणिक

विजय पुराणिक यांनी समारोप भाषणात सांगितले, की भारतीय जनता पक्षाचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो, हे भारतीय जनता पक्षातच शक्य होते. काही घटना घडल्यास पक्षकार्यकर्त्यांनी खचून न जाता त्यात कार्यकर्त्यामधून नेता तयार होतो. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष आमदार भोळे, तसेच खासदार रक्षा खडसे, संघटनमंत्री पुराणिक, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, माजी सरचिटणीस विजय धांडे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, पुरुजित चौधरी आदी पदाधिकारी कार्यकउपस्थित होते. 

बैठकीतील क्षणचित्रे... 
- बैठकीच्या वृत्तांकनासाठी पत्रकारांना आज प्रथमच प्रवेश नाकारण्यात आला होता. 
- येथील तहसीलदार महेश पवार यांनी त्यांना भेटण्यासाठी दुपारी दोन ते चार अशी वेळ निश्चित करून दालनाबाहेर फलक लावल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी दखल घेत शेतकऱ्यांनी शेती कामे सोडून दुपारी कसे भेटावे, असा प्रश्न करीत यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. 
- माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्ष सोडण्यासंदर्भात बैठकीत मान्यवरांनी शब्दही उच्चारला नाही. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top