शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या कामासाठी आता फेब्रूवारीचा अल्टीमेटम

Collector Abhijeet Raut
Collector Abhijeet Raut
Updated on



जळगाव ः
येथील शिवाजी नगर वासीयांसाठी महत्वाचा असलेला शिवाजीनगर उड्डाण पुलाचे (Shivajinagar Bridge) काम अद्यापही अपूर्णच आहे. या कामांची पाहणी आज जिल्हाधिकारी अभिजीत राउत (Collector Abhijeet Raut) यांनी सकाळी अकराला केली. माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी शिवाजी नगरच्या कामाबाबत वारंवार पाठपूरावा करून कामाची स्थिती काय आहे ? नागरिकांचे हाल कसे होताहेत याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी राउत यांच्याकडे आग्रह धरला होता.

Collector Abhijeet Raut
धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील साडेसात हजारांवर शेतकरी थकबाकीमुक्त


आज सकाळी जिल्हाधिकारी राऊत यांनी शिवाजी नगर पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी श्री.गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सूभाष राउत, कंत्राटदार उपस्थित होते. काम किती टक्के बाकी आहे, कोणकोणते बाकी, पोल शिफ्टींग किती बाकी आदी कामांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.

Collector Abhijeet Raut
महामार्गावरील खड्यांवर..ठाणेदार ठेवणार लक्ष


जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले, की शिवाजीनगरसह ममुराबाद, चोपडा, यावल कडे जाणाऱ्या नागरिकांसाठी शिवाजीनगर पुल महत्वाचा आहे. २५ टक्के नागरिकांची वाहतूक या पुलावरून होते. लवकरात लवकर पुलाचे काम व्हावे अशी अपेक्षा आहे. मात्र मध्यंतरी आलेला कोरोना, यंदा झालेली अतीवृष्टी यामुळे पुलाचे काम रखडले. निधी अभावी पुलाच्या कामात येणारे विजेच्या खांबाची अडचण होती. महापालिकेने आता निधी दिल्याने पोल शिफ्टींगचे काम सुरू केले आहे. लवकरच ते पुल जाईल. दोन महिन्यात स्लॅब लेव्हल पर्यंत काम करण्याचे व फेब्रूवारी २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या आहेत. याकामावर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून काम पूर्ण होण्यासाठी पाठपूरावा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Marathi News Esakal
www.esakal.com