
जळगाव : 3 लाखांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील माहेरवाशीन विवाहितेचा ३ लाख रुपयांसाठी छळ केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Marital harassment of woman for money in Jalgaon)
शहरातील रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहिता माधुरी पवन धनगर (वय २१) यांचा विवाहित कोल्ह (ता. पाचोरा) येथील पवन बाबूलाल धनगर यांच्याशी झाला आहे. लग्नाच्या काही दिवसांनंतर पती पवन धनगर याने विवाहितेला लहान-सहान कारणांवरून टोमणे मारणे सुरु केले. त्यानंतर घराच्या बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे, यासाठी तगादा लावला. परंतु विवाहितेच्या आई-वडिलांचे परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ३ लाख रुपये देऊ शकले नाही. या कारणावरून पती पवन धनगर याने शिवीगाळ करून मारहाण केली. विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती पवन बाबूलाल धनगर, सासू कल्पना बाबूलाल धनगर, सासरे बाबूलाल महादू धनगर (सर्व रा. कोल्ह ता. पाचोरा) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाईक महेंद्रसिंग पाटील करीत आहे.