Jalgaon Market Committee Election : लढतींचे चित्र आज स्षष्ट होणार; अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

Jalgaon Market Committee election
Jalgaon Market Committee electionesakal

Jalgaon Market Committee Election : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज माघारीची गुरुवारी (ता. २०) अंतिम मुदत आहे. माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. (Market Committee Election Last day for withdrawal of application Jalgaon news)

महाविकास आघाडी आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्यात खऱ्या अर्थाने टक्कर होणार आहे.

जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, पाचोरा, बोदवड, भुसावळ, यावल, धरणगाव, चोपडा, रावेर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया ६ एप्रिलपासून सुरू झाली असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Jalgaon Market Committee election
Jalgaon News : उद्धव ठाकरे या तारखेला जळगाव दौऱ्यावर

जळगावमध्ये मोठी चुरस

जळगाव बाजार समितीत मोठी चुरस आहे. १७ जागांसाठी तब्बल २८८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे कोण माघार घेणार, याकडे अधिक लक्ष आहे. काही उमेदवारांचे बिनविरोधसाठीही प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी धावपळही सुरू आहे, तसेच पक्षाच्या बैठकांचेही दिवसभर सत्र सुरू होते.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना (शिंदे गट)

जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) प्रणीत महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनलविरुद्ध भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) युतीची लढत आहे, तर अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामुळे माघारीनंतरच खऱ्या अर्थाने लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

Jalgaon Market Committee election
Jalgaon News : भिलाली बंधारा ठरणार शो पिस..! केवळ 10 फूट खोल पायाभरणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com