Market Committee Election : बाजार समितीची निवडणूक होणार की पुन्हा लांबणार?

Election
Election Esakal

रावेर (जि. जळगाव) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे, त्यामुळे २९ जानेवारीला मतदान होण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे शेवटच्या क्षणी निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. (Market committee election will be held or delayed again jalgaon news)

बाजार समितीने ७ डिसेंबरला मतदारांची अंतिम यादी जाहीर केली. त्यात हमाल मापारी मतदार संघाची १ जागा- २३४ मतदार, व्यापारी मतदारसंघाच्या २ जागा - ७६३ मतदार, विकास सोसायट्यांच्या ११ जागा - ७४६ मतदार आणि ग्रामपंचायतीच्या ४ जागा- ८९८ मतदार अंतिम मतदार यादीत आले आहेत. एकूण १८ जागांसाठी ही निवडणूक होणे अपेक्षित आहे. सहकार विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार या निवडणुका झाल्यास २३ डिसेंबरला निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. २९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

३० डिसेंबरला छाननी, २ जानेवारीला वैध उमेदवारांची नावे प्रसिद्ध करणे, १६ जानेवारीपर्यंत माघार, १७ जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी निशाणी वाटपासह जाहीर, २९ जानेवारीला मतदान आणि ३० जानेवारीला मतमोजणी होणे अपेक्षित आहे. आज अखेरपर्यंत येथील बाजार समितीकडे निवडणूक स्थगिती बाबतचे कुठलेही पत्र आलेले नाही. त्यामुळे बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी सहकार विभागाच्या आदेशानुसार मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून निवडणुकीची पुढील सिद्धता केली आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Election
Dengue Disease : डेंगी रुग्णांमध्ये झपाट्याने घट!

मात्र या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांनाही विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतीच्या गटातून उमेदवारी करता येऊ शकेल, असे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र त्याबाबतची नियमावली अजूनही तयार नसल्याने ही निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, निवडणूक होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी दिली. अन्य इच्छुकांशी संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठ पक्ष नेत्यांशी बोलूनच भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले.

Election
Success Story | जिद्द : अपंगत्व झुगारून सुरश्रीताईंची उद्योगभरारी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com